S M L

वन डेतून सचिन बाहेर

05 सप्टेंबरभारतीय टीमवरील दुखापतीचे विघ्न काही टळेना. आणि यावेळी दुखापतीने विकेट घेतलीय ती मास्टरब्लास्टर सचिनची. टाचेला झालेली दुखापत बळावल्यामुळे वन डे सीरिजमधून त्याने माघार घेतली आहे. याच दुखापतीमुळे पहिली वन डे सचिन खेळला नव्हता. आणि स्पेशालिस्टना भेटायला तो लंडनला गेला होता. पण स्पेशालिस्टनी दिलेला रिपोर्ट चांगला नाही. पूर्ण विश्रांतीचा सल्ला त्यांनी सचिनला दिला आहे. सचिनच्या टाचेवर दोन वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. पण टाचेचं हाड पुन्हा त्याला त्रास देतंय. सचिनच्या माघारीमुळे इंग्लंडमध्ये सेंच्युरीची सेंच्युरी पूर्ण करण्याचं त्याचं स्वप्न मात्र अपूर्ण राहणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 5, 2011 12:37 PM IST

वन डेतून सचिन बाहेर

05 सप्टेंबर

भारतीय टीमवरील दुखापतीचे विघ्न काही टळेना. आणि यावेळी दुखापतीने विकेट घेतलीय ती मास्टरब्लास्टर सचिनची. टाचेला झालेली दुखापत बळावल्यामुळे वन डे सीरिजमधून त्याने माघार घेतली आहे. याच दुखापतीमुळे पहिली वन डे सचिन खेळला नव्हता. आणि स्पेशालिस्टना भेटायला तो लंडनला गेला होता. पण स्पेशालिस्टनी दिलेला रिपोर्ट चांगला नाही. पूर्ण विश्रांतीचा सल्ला त्यांनी सचिनला दिला आहे. सचिनच्या टाचेवर दोन वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. पण टाचेचं हाड पुन्हा त्याला त्रास देतंय. सचिनच्या माघारीमुळे इंग्लंडमध्ये सेंच्युरीची सेंच्युरी पूर्ण करण्याचं त्याचं स्वप्न मात्र अपूर्ण राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2011 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close