S M L

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर

04 सप्टेंबरगेल्या दोन दिवसांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे कोकणात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ऐन गणेशोत्सादरम्यान कोकण रेल्वे ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. आज कोकण रेल्वे तात्पुरती सुरु झाली आहे. पण जोपर्यंत पाऊस पूर्णपणे थांबत नाहीत तोपर्यंत हे संकट कामय राहणार असल्याचं सांगण्यात येतंय. कोकण रेल्वे कोलमडलेली असतानाच आज पहाटे मुंबई-गोवा हायवेवर कशेडी घाटात दरड कोसळली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे ही वाहतूक महाड शहरातून विनेरे मार्गे वळविण्यात आली होती. दरम्यान, दरड हटवण्यात तब्बल दहा तासांनी यश आलंय. त्यामुळे मुंबई गोवा हायवेवरील वाहतुक धिम्या गतीनं का होईना पुन्हा सुरु झाली आहे. तर पावसामुळे मुंबई विमानतळावर परवा पहाटे घसरलेलं विमान बाजूला काढण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे विमान वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. विमानं 15 ते 20 मिनीटं उशीरानं उड्डान करत आहेत.100 गावांना सतर्कतेचा इशाराकोयना आणि चांदोली धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सांगलीत आयर्वीन पुलाजवळ कृष्णेची पातळी 35 फुटांवर गेली असून शहरातील कर्णाळ रोडवरील काका नगर, सुर्यवंशी आणि इनामदार प्लॉट मध्ये पुराचं पाणी शिरलंय. इथल्या 85 कुटुंबांना महापालिकेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलंय. जिल्ह्यातील जवळपास 100 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. औदूंबर इथल्या दत्त मंदिरात पाणी शिरलं आहे. आमणापूर, औदुम्बर, रेठरे आणि शितूर पुल पाण्याखाली गेले आहेत. तर शिराळा तालुक्यातील मांगले, चिकुर्डे आणि सावर्डे या पुलावरही पाणी आलं आहे. नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरलं असून जिल्ह्यातील 25 गावांचा संपर्क तुटला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2011 10:11 AM IST

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर

04 सप्टेंबर

गेल्या दोन दिवसांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे कोकणात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ऐन गणेशोत्सादरम्यान कोकण रेल्वे ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

आज कोकण रेल्वे तात्पुरती सुरु झाली आहे. पण जोपर्यंत पाऊस पूर्णपणे थांबत नाहीत तोपर्यंत हे संकट कामय राहणार असल्याचं सांगण्यात येतंय. कोकण रेल्वे कोलमडलेली असतानाच आज पहाटे मुंबई-गोवा हायवेवर कशेडी घाटात दरड कोसळली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

त्यामुळे ही वाहतूक महाड शहरातून विनेरे मार्गे वळविण्यात आली होती. दरम्यान, दरड हटवण्यात तब्बल दहा तासांनी यश आलंय. त्यामुळे मुंबई गोवा हायवेवरील वाहतुक धिम्या गतीनं का होईना पुन्हा सुरु झाली आहे. तर पावसामुळे मुंबई विमानतळावर परवा पहाटे घसरलेलं विमान बाजूला काढण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे विमान वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. विमानं 15 ते 20 मिनीटं उशीरानं उड्डान करत आहेत.

100 गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना आणि चांदोली धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सांगलीत आयर्वीन पुलाजवळ कृष्णेची पातळी 35 फुटांवर गेली असून शहरातील कर्णाळ रोडवरील काका नगर, सुर्यवंशी आणि इनामदार प्लॉट मध्ये पुराचं पाणी शिरलंय.

इथल्या 85 कुटुंबांना महापालिकेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलंय. जिल्ह्यातील जवळपास 100 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. औदूंबर इथल्या दत्त मंदिरात पाणी शिरलं आहे. आमणापूर, औदुम्बर, रेठरे आणि शितूर पुल पाण्याखाली गेले आहेत. तर शिराळा तालुक्यातील मांगले, चिकुर्डे आणि सावर्डे या पुलावरही पाणी आलं आहे. नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरलं असून जिल्ह्यातील 25 गावांचा संपर्क तुटला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2011 10:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close