S M L

कोल्हापुरात 90 बंधारे पाण्याखाली ; नदीकाठच्या गावांना हाय अलर्ट

04 सप्टेंबरकोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून नदीची वाटचाल धोकापातळीच्यावर सुरु आहे. पंचगंगेची राजाराम बंधार्‍यावरची पाणी पातळी 39.5 इंच इतकी आहे. जिल्ह्यातील 90 बंधारे पाण्याखाली असून 47 रस्त्यांवर पाणी आले आहे. राधानगरी धरण आणि काळम्मावाडी धरणातूनही पाणी सोडण्यात आले आहे. कळे बाजारभोगाव, अनुस्करा मार्ग, कोल्हापूर-गडहिंग्लज नागणवाडी मार्ग बंद झाले आहेत. तर कोल्हापूर - गगनबावडा तसेच कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर सुद्धा पाणी आलं आहे. जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना हाय अलर्ट दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 4, 2011 11:11 AM IST

04 सप्टेंबर

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून नदीची वाटचाल धोकापातळीच्यावर सुरु आहे. पंचगंगेची राजाराम बंधार्‍यावरची पाणी पातळी 39.5 इंच इतकी आहे. जिल्ह्यातील 90 बंधारे पाण्याखाली असून 47 रस्त्यांवर पाणी आले आहे. राधानगरी धरण आणि काळम्मावाडी धरणातूनही पाणी सोडण्यात आले आहे. कळे बाजारभोगाव, अनुस्करा मार्ग, कोल्हापूर-गडहिंग्लज नागणवाडी मार्ग बंद झाले आहेत. तर कोल्हापूर - गगनबावडा तसेच कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर सुद्धा पाणी आलं आहे. जिल्ह्यातील सर्व नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना हाय अलर्ट दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2011 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close