S M L

सरकारने एफआयआर दाखल करावा - केजरीवाल

05 सप्टेंबरटीम अण्णा आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जुंपली. अण्णांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी टॅक्स चुकवल्याचा आणि आपल्या एनजीओसाठी लाखो रुपये जमवल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केला होता. त्यावर केजरीवाल यांनी उत्तर दिलंय. बेजबाबदार वक्तव्य करण्याऐवजी सरकारने आपल्याविरोधात एफआयआर दाखल करावा असं आव्हान केजरीवाल यांनी दिलं आहे. अण्णा हजारे यांनीही दिग्विजय सिंग यांना फटकारले. सरकारचा चेहरा आता लोकांपुढे उघड झाला आहे असं अण्णांनी म्हटलं आहे. शिवाय, आपल्या आंदोलनाला संघाचा पाठिंबा आहे असं म्हणणार्‍या दिग्विजय सिंगांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची गरज आहे असा टोलाही अण्णांनी लगावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 5, 2011 05:24 PM IST

सरकारने एफआयआर दाखल करावा - केजरीवाल

05 सप्टेंबर

टीम अण्णा आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जुंपली. अण्णांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी टॅक्स चुकवल्याचा आणि आपल्या एनजीओसाठी लाखो रुपये जमवल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केला होता. त्यावर केजरीवाल यांनी उत्तर दिलंय. बेजबाबदार वक्तव्य करण्याऐवजी सरकारने आपल्याविरोधात एफआयआर दाखल करावा असं आव्हान केजरीवाल यांनी दिलं आहे. अण्णा हजारे यांनीही दिग्विजय सिंग यांना फटकारले. सरकारचा चेहरा आता लोकांपुढे उघड झाला आहे असं अण्णांनी म्हटलं आहे. शिवाय, आपल्या आंदोलनाला संघाचा पाठिंबा आहे असं म्हणणार्‍या दिग्विजय सिंगांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची गरज आहे असा टोलाही अण्णांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2011 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close