S M L

अटकेनंतर गावी पाठवण्याचा कट होता - अण्णा हजारे

06 सप्टेंबरबाबा रामदेव यांच्याप्रमाणेच आपलंही आंदोलन सुरू होण्यापूर्वीच उधळून लावण्याचा केंद्र सरकारचा डाव होता असा गौप्यस्फोट अण्णा हजारे यांनी केला. 16 ऑगस्टला उपोषण सुरू होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी अण्णा हजारेंना अटक केली होती. त्यावेळी दिल्ली एअरपोर्टवर एक विशेष विमान तयार होतं. तिहार जेलमधून सोडल्यानंतर आपल्याला या विमानातून पहिल्यांदा पुणे इथं नेलं जाणार होतं. आणि त्यानंतर राळेगणला पाठवण्याचा सरकारचा कट होता असं अण्णांनी म्हटलं आहे. जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीत दुसर्‍यांदा उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला. आणि सरकारने पहिल्या आंदोलनाचा प्रतिसाद लक्षात घेता अण्णांचे आंदोलन कसे रोखता येईल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. कपिल सिब्बल, दिग्विजय सिंग, मनोज तिवारी या काँग्रेसच्या नेत्यांना अण्णा आणि टीम अण्णावर जाहीर टीका करण्यास सुरूवात केली. मात्र अण्णांनी आपणं उपोषण करूनच राहणार या निर्णयावर ठाम राहिले. दरम्यान, बाबा रामदेव यांनी रामलीला मैदानावर काळ्या पैश्यांच्या संदर्भात आंदोलन केले होते. मात्र उपोषणाच्या पहिल्या रात्री पोलिसी कारवाई करून आंदोलन चिरडण्यात आले. अण्णाच्या आंदोलनावर पोलिसी कारवाईचे वादळ घोंघावत असताना 16 ऑगस्टला उपोषण स्थळी जात असताना अण्णांना भूषण यांच्या घरी पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर अण्णांना सात तास दिल्लीतील रस्त्यांवर फिरवण्यात आले. त्यानंतर अण्णांना 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत तिहार कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र अटकेनंतर आपल्याला दिल्ली एअरपोर्टवरून एका विशेष विमाने पुण्याला पाठवले जाणार होते तेथून आपल्या गावी राळेगणसिध्दीला पाठवले जाणार होते असा गौप्यस्फोट अण्णा हजारे यांनी आज राळेगणमध्ये केला. सरकार आपले आंदोलन चिरडून टाकणार होते असा आरोपही अण्णांनी यावेळी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2011 09:39 AM IST

अटकेनंतर गावी पाठवण्याचा कट होता - अण्णा हजारे

06 सप्टेंबर

बाबा रामदेव यांच्याप्रमाणेच आपलंही आंदोलन सुरू होण्यापूर्वीच उधळून लावण्याचा केंद्र सरकारचा डाव होता असा गौप्यस्फोट अण्णा हजारे यांनी केला. 16 ऑगस्टला उपोषण सुरू होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी अण्णा हजारेंना अटक केली होती. त्यावेळी दिल्ली एअरपोर्टवर एक विशेष विमान तयार होतं. तिहार जेलमधून सोडल्यानंतर आपल्याला या विमानातून पहिल्यांदा पुणे इथं नेलं जाणार होतं. आणि त्यानंतर राळेगणला पाठवण्याचा सरकारचा कट होता असं अण्णांनी म्हटलं आहे.

जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीत दुसर्‍यांदा उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला. आणि सरकारने पहिल्या आंदोलनाचा प्रतिसाद लक्षात घेता अण्णांचे आंदोलन कसे रोखता येईल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. कपिल सिब्बल, दिग्विजय सिंग, मनोज तिवारी या काँग्रेसच्या नेत्यांना अण्णा आणि टीम अण्णावर जाहीर टीका करण्यास सुरूवात केली. मात्र अण्णांनी आपणं उपोषण करूनच राहणार या निर्णयावर ठाम राहिले. दरम्यान, बाबा रामदेव यांनी रामलीला मैदानावर काळ्या पैश्यांच्या संदर्भात आंदोलन केले होते. मात्र उपोषणाच्या पहिल्या रात्री पोलिसी कारवाई करून आंदोलन चिरडण्यात आले. अण्णाच्या आंदोलनावर पोलिसी कारवाईचे वादळ घोंघावत असताना 16 ऑगस्टला उपोषण स्थळी जात असताना अण्णांना भूषण यांच्या घरी पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर अण्णांना सात तास दिल्लीतील रस्त्यांवर फिरवण्यात आले. त्यानंतर अण्णांना 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत तिहार कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र अटकेनंतर आपल्याला दिल्ली एअरपोर्टवरून एका विशेष विमाने पुण्याला पाठवले जाणार होते तेथून आपल्या गावी राळेगणसिध्दीला पाठवले जाणार होते असा गौप्यस्फोट अण्णा हजारे यांनी आज राळेगणमध्ये केला. सरकार आपले आंदोलन चिरडून टाकणार होते असा आरोपही अण्णांनी यावेळी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2011 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close