S M L

कशेडी घाटाचा मार्ग मोकळा

06 सप्टेंबरअखेर 63 तासांनी कशेडी घाटातील वाहतूक सुरू झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून दरड कोसळल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या तीन दिवसात चार वेळा घाटात दरड कोसळल्यामुळे कामात अडथळे निर्माण होतं होते. पर्यायी मार्ग म्हणून कोल्हापूर मार्ग वाहतूक वळवण्यात आली होती. दरडीचे विघ्न आज सकाळपर्यंत सुरू होते. साडे दहाच्या सुमाराला डोंगरावरुन दरडीचा काही भाग कोसळला. त्यानंतर बांधकाम विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचार्‍यांनी तातडीनं, हा ढिगारा हलवला. त्यामुळे हलक्या वाहनांची वाहतूक सुरू झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2011 02:10 PM IST

कशेडी घाटाचा मार्ग मोकळा

06 सप्टेंबर

अखेर 63 तासांनी कशेडी घाटातील वाहतूक सुरू झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून दरड कोसळल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या तीन दिवसात चार वेळा घाटात दरड कोसळल्यामुळे कामात अडथळे निर्माण होतं होते. पर्यायी मार्ग म्हणून कोल्हापूर मार्ग वाहतूक वळवण्यात आली होती. दरडीचे विघ्न आज सकाळपर्यंत सुरू होते. साडे दहाच्या सुमाराला डोंगरावरुन दरडीचा काही भाग कोसळला. त्यानंतर बांधकाम विभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचार्‍यांनी तातडीनं, हा ढिगारा हलवला. त्यामुळे हलक्या वाहनांची वाहतूक सुरू झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2011 02:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close