S M L

कोल्हापुरात बाप्पाचे विसर्जन सतर्कतेच्या रेषेत

06 सप्टेंबरपंचगंगेचं पाणी अजूनही पात्राबाहेर असल्याने गौरी गणपतीच्या विसर्जनाला कोल्हापूरकरांना काहिली म्हणजेच छोट्या गोल नावांमधून जावं लागतंय. कोल्हापुरात आज घरगुती गौरी गणपतीच्या विसर्जनाला उत्साहात सुरवात झाली. पंचगंगा नदी अजूनही पात्राबाहेर आहे. त्यामुळे गणेश भक्तांना पंचगंगा घाटावर विसर्जन करता येत नाही. गणेशभक्त पर्यायी ठिकाणी गणेश विसर्जन करत आहे. गणेशमुर्ती थेट पंचगंगा नदी पात्रात विसर्जीत करता येत नसल्यामुळे नदी काठावरचे स्वंयसेवक गणेशमूर्ती एकत्र करुन काहिलीतून नदी पात्रात विसर्जीत करत आहे. त्याचबरोबर रंकाळा, खण, कोटीतीर्थ, राजाराम तलाव या ठिकाणीही बाप्पांचं विसर्जन सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 6, 2011 08:04 AM IST

कोल्हापुरात बाप्पाचे विसर्जन सतर्कतेच्या रेषेत

06 सप्टेंबर

पंचगंगेचं पाणी अजूनही पात्राबाहेर असल्याने गौरी गणपतीच्या विसर्जनाला कोल्हापूरकरांना काहिली म्हणजेच छोट्या गोल नावांमधून जावं लागतंय. कोल्हापुरात आज घरगुती गौरी गणपतीच्या विसर्जनाला उत्साहात सुरवात झाली. पंचगंगा नदी अजूनही पात्राबाहेर आहे. त्यामुळे गणेश भक्तांना पंचगंगा घाटावर विसर्जन करता येत नाही. गणेशभक्त पर्यायी ठिकाणी गणेश विसर्जन करत आहे. गणेशमुर्ती थेट पंचगंगा नदी पात्रात विसर्जीत करता येत नसल्यामुळे नदी काठावरचे स्वंयसेवक गणेशमूर्ती एकत्र करुन काहिलीतून नदी पात्रात विसर्जीत करत आहे. त्याचबरोबर रंकाळा, खण, कोटीतीर्थ, राजाराम तलाव या ठिकाणीही बाप्पांचं विसर्जन सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2011 08:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close