S M L

टीम इंडियासाठी आज करो या मरो !

09 सप्टेंबरभारत आणि इंग्लंडदरम्यान ओव्हल मैदानावर आजपासून तिसरी वन डे मॅच रंगणार आहे. पण भारतीय टीमसमोर टेस्टमध्ये ज्या समस्या होत्या. त्याच अजूनही कायम आहेत. फरक इतकाच आहे की बॅटिंगमधील कामगिरी सुधारली आहे. पण बॉलिंग अजूनही कमालीची दुबळी वाटत आहे. टीम इंडियाची बॉलिंग हीच टीमची सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरली. सुरेश रैना आणि विराट कोहली हे तर कामचलाऊ बॉलर्स आहेत. पण पाचव्या बॉलरची उणीव ते नाही भरुन काढू शकतं. त्यामुळे धोणीला सात फिट बॅट्समन निवडताना जशी कसरत करावी लागते तशी मॅचमध्ये बॉलर्स वापरतानाही त्याची दमछाक होते. दुसर्‍या वन डे नंतर ही व्यथा त्याने उघडपणे बोलूनही दाखवली. महेंद्र सिंग धोणी म्हणतो, 50 ओव्हरमधल्या त्या दहा ओव्हर कशा भरुन काढायच्या हा माझ्यापुढचा मोठा प्रश्न असतो. विराट, रैना यांना मी दोष देऊ शकत नाही. आधीच्या चार बॉलर्सनी आधीच रन लुटले असतील तर पाचवा बॉलर कसा वापरायचा हे कळेनासं होतं.धोणी म्हणतो यात तथ्य आहे. कारण नवीन बॉल वापरताना नेहमीचे बॉलर्सही झगडत आहे. रोझबॉल वन डेत बॅट्समननी पुरेसे रन केले होते. पण किसवेटर आणि इयन बेल यांनी प्रवीण आणि विनय कुमारची अशी काही धुलाई केली की इंग्लंडचं पुढचं काम सोपं झालं. धोणी म्हणतो, मॅच 23 ओव्हर्सची होते तेव्हा दुसरी बॅटिंग करताना तुम्हाला चांगली सुरुवात लागते. आणि पहिल्या पाच ओव्हर्समध्ये इंग्लंडने 50 रन वसूल केले आणि दहा ओव्हरमध्ये त्यांनी शंभरी गाठली तेव्हाच मॅचचा निकाल स्पष्ट झाला.अर्थात पहिल्या दोन वन डेमध्ये भारतासाठी एक जमेची बाजू आहे. ती म्हणजे बॅटिंग. पार्थिव पटेल, अजिंक्य रहाणे, विराट कोहली आणि सुरेश रैना चांगली कामगिरी करत आहे. आणि त्यामुळेच इंग्लंडची टीमही वन डे सीरिजबद्दल बोलताना सावध आहे. इंग्लंड टीमचा कॅप्टन ऍलिस्टर कूक म्हणतो, भारतीय खेळाडूंकडे कौशल्य आहे याबद्दल आमचं दुमत नाही. त्यांच्या प्रत्येक बॅट्समनला आऊट करणं हे एक आव्हान असतं. वन डेमध्ये तर ते चांगलीच बॅटिंग करतायत. शेवटच्या ओव्हरमध्ये रैनाला आवरणं तर खुपच कठीण आहे.आता शुक्रवारची मॅच भारतासाठी करो या मरोची मॅच असणार आहे. तर सीरिजवरची पकड आणखी मजबूत करण्याचा इंग्लंड टीमचा प्रयत्न असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2011 10:20 AM IST

09 सप्टेंबर

भारत आणि इंग्लंडदरम्यान ओव्हल मैदानावर आजपासून तिसरी वन डे मॅच रंगणार आहे. पण भारतीय टीमसमोर टेस्टमध्ये ज्या समस्या होत्या. त्याच अजूनही कायम आहेत. फरक इतकाच आहे की बॅटिंगमधील कामगिरी सुधारली आहे. पण बॉलिंग अजूनही कमालीची दुबळी वाटत आहे.

टीम इंडियाची बॉलिंग हीच टीमची सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरली. सुरेश रैना आणि विराट कोहली हे तर कामचलाऊ बॉलर्स आहेत. पण पाचव्या बॉलरची उणीव ते नाही भरुन काढू शकतं. त्यामुळे धोणीला सात फिट बॅट्समन निवडताना जशी कसरत करावी लागते तशी मॅचमध्ये बॉलर्स वापरतानाही त्याची दमछाक होते. दुसर्‍या वन डे नंतर ही व्यथा त्याने उघडपणे बोलूनही दाखवली.

महेंद्र सिंग धोणी म्हणतो, 50 ओव्हरमधल्या त्या दहा ओव्हर कशा भरुन काढायच्या हा माझ्यापुढचा मोठा प्रश्न असतो. विराट, रैना यांना मी दोष देऊ शकत नाही. आधीच्या चार बॉलर्सनी आधीच रन लुटले असतील तर पाचवा बॉलर कसा वापरायचा हे कळेनासं होतं.

धोणी म्हणतो यात तथ्य आहे. कारण नवीन बॉल वापरताना नेहमीचे बॉलर्सही झगडत आहे. रोझबॉल वन डेत बॅट्समननी पुरेसे रन केले होते. पण किसवेटर आणि इयन बेल यांनी प्रवीण आणि विनय कुमारची अशी काही धुलाई केली की इंग्लंडचं पुढचं काम सोपं झालं.

धोणी म्हणतो, मॅच 23 ओव्हर्सची होते तेव्हा दुसरी बॅटिंग करताना तुम्हाला चांगली सुरुवात लागते. आणि पहिल्या पाच ओव्हर्समध्ये इंग्लंडने 50 रन वसूल केले आणि दहा ओव्हरमध्ये त्यांनी शंभरी गाठली तेव्हाच मॅचचा निकाल स्पष्ट झाला.

अर्थात पहिल्या दोन वन डेमध्ये भारतासाठी एक जमेची बाजू आहे. ती म्हणजे बॅटिंग. पार्थिव पटेल, अजिंक्य रहाणे, विराट कोहली आणि सुरेश रैना चांगली कामगिरी करत आहे. आणि त्यामुळेच इंग्लंडची टीमही वन डे सीरिजबद्दल बोलताना सावध आहे. इंग्लंड टीमचा कॅप्टन ऍलिस्टर कूक म्हणतो, भारतीय खेळाडूंकडे कौशल्य आहे याबद्दल आमचं दुमत नाही. त्यांच्या प्रत्येक बॅट्समनला आऊट करणं हे एक आव्हान असतं. वन डेमध्ये तर ते चांगलीच बॅटिंग करतायत. शेवटच्या ओव्हरमध्ये रैनाला आवरणं तर खुपच कठीण आहे.

आता शुक्रवारची मॅच भारतासाठी करो या मरोची मॅच असणार आहे. तर सीरिजवरची पकड आणखी मजबूत करण्याचा इंग्लंड टीमचा प्रयत्न असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2011 10:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close