S M L

बीसीसीआयमध्ये बदल होण्याची शक्यता

08 सप्टेंबरबीसीसीआयमध्येही येत्या काही महिन्यात बदल होण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी निवड समितीला मात्र एका वर्षाने मुदतवाढ मिळणार असल्याची बातमी आहे. अध्यक्ष श्रीकांत यांच्याबरोबरच 5 पैकी 4 सदस्यही समितीवर कायम राहणार आहे. श्रीकांत यांचं अध्यक्ष म्हणून हे चौथं वर्षं असेल. पण यशपाल शर्मा यांचा 4 वर्षांचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांच्या ऐवजी विक्रम राठोड यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. याच महिन्यात होणार्‍या बीसीसीआयच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल. इंग्लंडमधे भारतीय टीमची कामगिरी खराब होतेय. त्यामुळे निवड समितीतही बदल होतील अशी चर्चा होती. पण सध्यातरी तशी काही शक्यता नसल्याचं समजतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 8, 2011 12:19 PM IST

08 सप्टेंबर

बीसीसीआयमध्येही येत्या काही महिन्यात बदल होण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी निवड समितीला मात्र एका वर्षाने मुदतवाढ मिळणार असल्याची बातमी आहे. अध्यक्ष श्रीकांत यांच्याबरोबरच 5 पैकी 4 सदस्यही समितीवर कायम राहणार आहे. श्रीकांत यांचं अध्यक्ष म्हणून हे चौथं वर्षं असेल. पण यशपाल शर्मा यांचा 4 वर्षांचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांच्या ऐवजी विक्रम राठोड यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. याच महिन्यात होणार्‍या बीसीसीआयच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल. इंग्लंडमधे भारतीय टीमची कामगिरी खराब होतेय. त्यामुळे निवड समितीतही बदल होतील अशी चर्चा होती. पण सध्यातरी तशी काही शक्यता नसल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2011 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close