S M L

औरंगाबादमध्ये 'श्लोक'च्या वतीने पेंटिंग प्रदर्शन

09 सप्टेंबरदरवर्षीप्रमाणे यंदाही श्लोक संस्थेच्या वतीने खास गणेशोत्सवानिमित्ताने औरंगाबादमध्ये पेंटिंग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे. बाप्पाच्या चित्रांपासून ते स्त्रीभृण हत्येसारख्या महत्वाच्या विषयांवर या प्रदर्शनात चित्रकारांनी आपली चित्र साकारली आहे. औरंगाबादमध्ये श्लोक या संस्थेच्या शीतल दर्डा यांच्या संकल्पनेतून भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाचा औरंगाबादकर तीन दिवस लाभ घेऊ शकणार आहे. मराठवाड्यामधील कंलावंताच्या या प्रदर्शनाने रसिक मनांना अक्षरश: भुरळ घातली आहे. या प्रदर्शनामुळे आपली कला सादर करायला चांगली संधी मिळाल्याने कलावंतही खूश आहेत. तर या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शनाला जगप्रसिध्द चित्रकार एम एफ हुसेन यांची कन्या अलिका हुसेन यांचीही उपस्थिती लाभली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2011 11:14 AM IST

09 सप्टेंबर

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्लोक संस्थेच्या वतीने खास गणेशोत्सवानिमित्ताने औरंगाबादमध्ये पेंटिंग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे. बाप्पाच्या चित्रांपासून ते स्त्रीभृण हत्येसारख्या महत्वाच्या विषयांवर या प्रदर्शनात चित्रकारांनी आपली चित्र साकारली आहे. औरंगाबादमध्ये श्लोक या संस्थेच्या शीतल दर्डा यांच्या संकल्पनेतून भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाचा औरंगाबादकर तीन दिवस लाभ घेऊ शकणार आहे. मराठवाड्यामधील कंलावंताच्या या प्रदर्शनाने रसिक मनांना अक्षरश: भुरळ घातली आहे. या प्रदर्शनामुळे आपली कला सादर करायला चांगली संधी मिळाल्याने कलावंतही खूश आहेत. तर या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शनाला जगप्रसिध्द चित्रकार एम एफ हुसेन यांची कन्या अलिका हुसेन यांचीही उपस्थिती लाभली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2011 11:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close