S M L

मनसेचे दिवंगत आ. रमेश वांजळेंच्या पत्नी राष्ट्रवादीच्या वाटेवर

08 सप्टेंबरमनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांची आयबीएन लोकमतला दिली. खडकवासला पोटनिवडणुकीत त्या राष्ट्रवादीकडून उभ्या राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांच्या निधनानंतर खडकवासला मतदारसंघाची पोटनिवडणूक 13 ऑक्टोबरला जाहीर झाली. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला. रमेश वांजळेचा वारसदार अजून स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे रमेश वांजळेच्या पत्नी हर्षदा वांजळे यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सर्वच राजकीय पक्षाकंडून सुरु आहे. या मतदारसंघात मनसे,राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये अशी तिरंगी लढत रंगणार असून मुख्य लढत मात्र राष्ट्रवादी आणि मनसे अशीच होणार आहे. त्यामुळे मनसे हर्षदा यांना तिकीट देणार की त्या राष्ट्रवादीची वाट धरणार हे चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होणार आहे. हर्षदा वांजळे सध्या काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 8, 2011 06:08 PM IST

08 सप्टेंबर

मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांची आयबीएन लोकमतला दिली. खडकवासला पोटनिवडणुकीत त्या राष्ट्रवादीकडून उभ्या राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांच्या निधनानंतर खडकवासला मतदारसंघाची पोटनिवडणूक 13 ऑक्टोबरला जाहीर झाली.

या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला. रमेश वांजळेचा वारसदार अजून स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे रमेश वांजळेच्या पत्नी हर्षदा वांजळे यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सर्वच राजकीय पक्षाकंडून सुरु आहे. या मतदारसंघात मनसे,राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये अशी तिरंगी लढत रंगणार असून मुख्य लढत मात्र राष्ट्रवादी आणि मनसे अशीच होणार आहे. त्यामुळे मनसे हर्षदा यांना तिकीट देणार की त्या राष्ट्रवादीची वाट धरणार हे चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होणार आहे. हर्षदा वांजळे सध्या काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2011 06:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close