S M L

आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत भारत फायनलमध्ये

09 सप्टेंबरआशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता फायनलमध्ये भारताची गाठ पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी पडणार आहे. त्याआधी आज झालेल्या लीग मॅचमध्ये या दोन्ही टीम आमने सामने आल्या होत्या. दोन्ही टीमने जबरदस्त खेळ केला. पण ही मॅच 2-2 अशी बरोबरीत सुटली. मॅच ड्रॉ झाली असली तरी स्पर्धेत अव्वल स्थानावर असलेल्या पाकिस्तानने फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. भारताचे भवितव्य मात्र जपान आणि मलेशियादरम्यान होणार्‍या मॅचवर अवलंबून होतं. या मॅचमध्ये जपानची टीम विजयी ठरली असती तर भारतीय टीम फायनलसाठी अपात्र ठरली असती. पण मलेशियाने जपानचा 3-2 असा पराभव केला आणि भारतासाठी फायनलचा दरवाचा उघडून दिला. आता रविवारी भारत आणि पाकिस्तानदरम्यान मेगाफायनल रंगणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2011 02:05 PM IST

आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत भारत फायनलमध्ये

09 सप्टेंबर

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता फायनलमध्ये भारताची गाठ पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी पडणार आहे. त्याआधी आज झालेल्या लीग मॅचमध्ये या दोन्ही टीम आमने सामने आल्या होत्या. दोन्ही टीमने जबरदस्त खेळ केला. पण ही मॅच 2-2 अशी बरोबरीत सुटली. मॅच ड्रॉ झाली असली तरी स्पर्धेत अव्वल स्थानावर असलेल्या पाकिस्तानने फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. भारताचे भवितव्य मात्र जपान आणि मलेशियादरम्यान होणार्‍या मॅचवर अवलंबून होतं. या मॅचमध्ये जपानची टीम विजयी ठरली असती तर भारतीय टीम फायनलसाठी अपात्र ठरली असती. पण मलेशियाने जपानचा 3-2 असा पराभव केला आणि भारतासाठी फायनलचा दरवाचा उघडून दिला. आता रविवारी भारत आणि पाकिस्तानदरम्यान मेगाफायनल रंगणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2011 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close