S M L

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेमाची पताका

09 सप्टेंबरआज 58 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण दिल्लीत झालं. या पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमानं बाजी मारली. 'मी सिंधुताई सपकाळ' या सिनेमाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. दिग्दर्शक अनंत महादेवन आणि निर्माती बिंदीया खानोलकर यांनी हा स्वीकारला. याच सिनेमाच्या पटकथा आणि संवादासाठी संजय पवार यांना पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.तर दुसरीकडे मला आई व्हायचंय या सिनेमाला सामाजिक सिनेमा विभागात सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. सिनेमाच्या निर्मात्या समृद्धी पोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सरोगेट मदर या विषयावर हा सिनेमा आहे. सिनेमात उर्मिला कानिटकरची मुख्य भूमिका आहे. तसेच बाबू बँड बाजा सिनेमालाही दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मिताली जगतापला पुरस्कार मिळाला. तर राजेश पिंजानीला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. चँपियन सिनेमाही पुरस्कारांमध्ये चँपियन ठरला. सिनेमाच्या दोन बाल कलाकारांना पुरस्कार मिळाला. ऐश्वर्या नारकर आणि दिग्दर्शक रमेश मोरे यांनी पुरस्कार स्वीकारला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 9, 2011 04:55 PM IST

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेमाची पताका

09 सप्टेंबर

आज 58 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण दिल्लीत झालं. या पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमानं बाजी मारली. 'मी सिंधुताई सपकाळ' या सिनेमाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. दिग्दर्शक अनंत महादेवन आणि निर्माती बिंदीया खानोलकर यांनी हा स्वीकारला. याच सिनेमाच्या पटकथा आणि संवादासाठी संजय पवार यांना पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

तर दुसरीकडे मला आई व्हायचंय या सिनेमाला सामाजिक सिनेमा विभागात सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. सिनेमाच्या निर्मात्या समृद्धी पोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सरोगेट मदर या विषयावर हा सिनेमा आहे. सिनेमात उर्मिला कानिटकरची मुख्य भूमिका आहे. तसेच बाबू बँड बाजा सिनेमालाही दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मिताली जगतापला पुरस्कार मिळाला. तर राजेश पिंजानीला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. चँपियन सिनेमाही पुरस्कारांमध्ये चँपियन ठरला. सिनेमाच्या दोन बाल कलाकारांना पुरस्कार मिळाला. ऐश्वर्या नारकर आणि दिग्दर्शक रमेश मोरे यांनी पुरस्कार स्वीकारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2011 04:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close