S M L

राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर

10 सप्टेंबरसायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी केलेला संपाबाबत आज तोडगा निघाला नाही. या संपात आता राज्यभरातील निवासी डॉक्टर उतरले आहेत. आज मार्ड आणि मुंबई महापालिका अधिकार्‍यांची बैठक झाली. महापालिका प्रशासनाने निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलंय. पण लेखी आश्वासन देण्याची मागणी मार्डने केली. उद्या सकाळी साडे अकरा वाजता सरकारने मार्डच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली. वैद्यकीय शिक्षण संचालनालयच्या ऑफिसमध्ये ही बैठक होणार आहे. दरम्यान, मुंबईच्या महापौर श्रद्धा जाधव यांनी आज सायन हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टरांची भेट घेतली. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याशी फोनवरुन चर्चा केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2011 10:19 AM IST

राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर

10 सप्टेंबर

सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी केलेला संपाबाबत आज तोडगा निघाला नाही. या संपात आता राज्यभरातील निवासी डॉक्टर उतरले आहेत. आज मार्ड आणि मुंबई महापालिका अधिकार्‍यांची बैठक झाली. महापालिका प्रशासनाने निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलंय. पण लेखी आश्वासन देण्याची मागणी मार्डने केली. उद्या सकाळी साडे अकरा वाजता सरकारने मार्डच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली. वैद्यकीय शिक्षण संचालनालयच्या ऑफिसमध्ये ही बैठक होणार आहे. दरम्यान, मुंबईच्या महापौर श्रद्धा जाधव यांनी आज सायन हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टरांची भेट घेतली. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याशी फोनवरुन चर्चा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2011 10:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close