S M L

डॉक्टरांच्या संपावर राज ठाकरेंची मध्यस्थी

10 सप्टेंबरसायन हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मध्यस्थी केली. राज ठाकरेंनी आज सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन संपकरी डॉक्टर्सची भेट घेतली. तसेच त्यांच्या काय मागण्या आहेत तेही जाणून घेतलं. तर निवासी डॉक्टर्सच्या मागण्यांना आपला पाठिंबा असल्याचंही त्यांना म्हटलं आहे. डॉक्टर्सच्या अतिशय किरकोळ अशा मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने असे प्रकार घडत असल्याचे राज ठाकरेंनी म्हटलंय. या मुद्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त सुबोधकुमार यांची भेट घेणार आहेत. तसेच लोकांचा आणखी रोष ओढवून न घेता डॉक्टर्सनी संप मागे घेण्याचे आवाहनही राज ठाकरेंनी केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 10, 2011 10:44 AM IST

डॉक्टरांच्या संपावर राज ठाकरेंची मध्यस्थी

10 सप्टेंबर

सायन हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मध्यस्थी केली. राज ठाकरेंनी आज सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन संपकरी डॉक्टर्सची भेट घेतली. तसेच त्यांच्या काय मागण्या आहेत तेही जाणून घेतलं. तर निवासी डॉक्टर्सच्या मागण्यांना आपला पाठिंबा असल्याचंही त्यांना म्हटलं आहे. डॉक्टर्सच्या अतिशय किरकोळ अशा मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने असे प्रकार घडत असल्याचे राज ठाकरेंनी म्हटलंय. या मुद्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त सुबोधकुमार यांची भेट घेणार आहेत. तसेच लोकांचा आणखी रोष ओढवून न घेता डॉक्टर्सनी संप मागे घेण्याचे आवाहनही राज ठाकरेंनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2011 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close