S M L

विसर्जन मिरवणुकीत गॅलरी कोसळून 1 ठार

11 सप्टेंबरमुंबईतल्या मानाच्या लालबागचा राजाची मिरवणूक सुरू असतानाचा एक दुर्देवी घटना घडली. भारतमाता परिसराजवळ राजाचं दर्शन घ्यायला बिल्डिंगच्या गॅलरीत गर्दी झाली होती. त्याचवेळी अचानक 25 ते 30 जण उभे असलेलं दुकानाचं छप्पर अचानक कोसळलं. यात एकाचा मृत्यू झाला आहे. यात 4 ते 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना के ई एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.लालाबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक भारतमाता परिसरात पोहचली. दरवर्षीप्रमाणे राजाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली. बिल्डिंगच्या गॅलरीतून राजाला पाहण्यासाठी रहिवाश्यांनी गर्दी केली. याचवेळी एका पत्राच्या दुकानाच्या वरच्या बिल्डिंगच्या गॅलरीत 20 ते 30 भक्त दाटीवाटीने उभे होते. अतिरिक्त भार झाल्यामुळे गॅलरी कोसळली आणि सर्वजण रस्त्यावर येऊन पडले. यातील जखमींना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यातील एकाचा दुदैर्वी मृत्यू झाला. राजाची मिरवणूक सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2011 11:21 AM IST

विसर्जन मिरवणुकीत गॅलरी कोसळून 1 ठार

11 सप्टेंबर

मुंबईतल्या मानाच्या लालबागचा राजाची मिरवणूक सुरू असतानाचा एक दुर्देवी घटना घडली. भारतमाता परिसराजवळ राजाचं दर्शन घ्यायला बिल्डिंगच्या गॅलरीत गर्दी झाली होती. त्याचवेळी अचानक 25 ते 30 जण उभे असलेलं दुकानाचं छप्पर अचानक कोसळलं. यात एकाचा मृत्यू झाला आहे. यात 4 ते 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना के ई एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

लालाबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक भारतमाता परिसरात पोहचली. दरवर्षीप्रमाणे राजाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली. बिल्डिंगच्या गॅलरीतून राजाला पाहण्यासाठी रहिवाश्यांनी गर्दी केली. याचवेळी एका पत्राच्या दुकानाच्या वरच्या बिल्डिंगच्या गॅलरीत 20 ते 30 भक्त दाटीवाटीने उभे होते. अतिरिक्त भार झाल्यामुळे गॅलरी कोसळली आणि सर्वजण रस्त्यावर येऊन पडले. यातील जखमींना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यातील एकाचा दुदैर्वी मृत्यू झाला. राजाची मिरवणूक सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2011 11:21 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close