S M L

निवासी डॉक्टरांचा संप मागे

11 सप्टेंबरमुंबईसह राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. चौथ्या दिवशीहा संप मागे घेण्यात आला आहे. आज सरकारचे प्रतिनिधी आणि मार्डच्या अधिकार्‍यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत आश्वासन दिल्यानंतर आपण संप मागे घेत आहोत असं जाहीर केलं. गुरूवारी मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमधील 2150 डॉक्टर्स बेमुदत संपावर गेले होते. बुधवारी रात्री सायन हॉस्पिटलमध्ये एका 10 महिन्यांच्या मुलीचा न्युमोनियामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांनाच मारहाण केली. यात एका डॉक्टरचा पाय फ्रॅक्चर झाला होता. या मारहाणीविरोधात डॉक्टर्स संपावर गेले होते. यात मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमधील सतराशे आणि जे जे हॉस्पिटलमधील साडे चारशे डॉक्टर्सचा समावेश होता. मुंबईतील संपाला पाठिंबा देत औरंगाबाद मध्येही निवासी डॉक्टर संपावर गेले होते. औरंगाबादमध्येही बुधवारी रात्री रूग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली होती. मारहाण करणार्‍यांना अटक होईपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने घेतली होती. आज झालेल्या बैठकीमुळे डॉक्टर पुन्हा सेवेवर दाखल झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2011 12:47 PM IST

निवासी डॉक्टरांचा संप मागे

11 सप्टेंबर

मुंबईसह राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. चौथ्या दिवशीहा संप मागे घेण्यात आला आहे. आज सरकारचे प्रतिनिधी आणि मार्डच्या अधिकार्‍यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत आश्वासन दिल्यानंतर आपण संप मागे घेत आहोत असं जाहीर केलं.

गुरूवारी मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमधील 2150 डॉक्टर्स बेमुदत संपावर गेले होते. बुधवारी रात्री सायन हॉस्पिटलमध्ये एका 10 महिन्यांच्या मुलीचा न्युमोनियामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांनाच मारहाण केली. यात एका डॉक्टरचा पाय फ्रॅक्चर झाला होता. या मारहाणीविरोधात डॉक्टर्स संपावर गेले होते. यात मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमधील सतराशे आणि जे जे हॉस्पिटलमधील साडे चारशे डॉक्टर्सचा समावेश होता. मुंबईतील संपाला पाठिंबा देत औरंगाबाद मध्येही निवासी डॉक्टर संपावर गेले होते. औरंगाबादमध्येही बुधवारी रात्री रूग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली होती. मारहाण करणार्‍यांना अटक होईपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने घेतली होती. आज झालेल्या बैठकीमुळे डॉक्टर पुन्हा सेवेवर दाखल झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2011 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close