S M L

'जनलोकपाल'साठी टीम अण्णा देशभर करणार दौरा

11 सप्टेंबरजनलोकपाल विधेयकासाठी एकत्र आलेल्या टीम अण्णांच्या कोअर कमिटीच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस होता. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हिवाळी अधिवेशनापूर्वी जनलोकपालवर सार्वमत घ्यावं अशी टीम अण्णांची मागणी आहे. तर ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जवळ आहेत त्या राज्यात भ्रष्टाचाराविरोधात खुद्द अण्णा यात्रा काढणार असल्याची माहितीही केजरीवाल यांनी दिली. टीम अण्णा आता सरकारच्या विरोधात मैदानात उतरली आहे. टीम अण्णा आता ज्या राज्यात निवडणूका होणार आहे त्या राज्यात दौरा करणार आहे आणि लोकांना जनलोकपाल आणि निवडणुकीबद्दल जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे. जनलोकपाल विधेयकाला विरोध करणार्‍या खासदारांना आपण निवडणू देणार आहात का असा सवाल टीम अण्णांकडून लोकांना विचारला जाणार आहे. सरकार विरोधात रणशिंग फुंकणारी टीम अण्णाही आपल्या कामात अधिक पारदर्शकपणा आणणार आहे. याचं पहिलं पाऊल असणार आहे ते 1 एप्रिल ते 30 आतापर्यंत आंदोलनावर होणार खर्चाचं ऑडिट. हे ऑडिट आपल्या वेबसाईटवर प्रसिध्द करणार आहे. सोबतच टीम अण्णा समितीचे सर्व सदस्य आपल्या संपत्तीही वेबसाईटवर जाहीर करणार आहे. आणि कोणालाही टीम अण्णाच्या विरोधात कोणतीही तक्रार असेल तर त्याची चौकशी तीन निवृत्त न्यायधीश करतील अशी माहिती टीम अण्णांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2011 04:44 PM IST

'जनलोकपाल'साठी टीम अण्णा देशभर करणार दौरा

11 सप्टेंबर

जनलोकपाल विधेयकासाठी एकत्र आलेल्या टीम अण्णांच्या कोअर कमिटीच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस होता. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हिवाळी अधिवेशनापूर्वी जनलोकपालवर सार्वमत घ्यावं अशी टीम अण्णांची मागणी आहे. तर ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जवळ आहेत त्या राज्यात भ्रष्टाचाराविरोधात खुद्द अण्णा यात्रा काढणार असल्याची माहितीही केजरीवाल यांनी दिली.

टीम अण्णा आता सरकारच्या विरोधात मैदानात उतरली आहे. टीम अण्णा आता ज्या राज्यात निवडणूका होणार आहे त्या राज्यात दौरा करणार आहे आणि लोकांना जनलोकपाल आणि निवडणुकीबद्दल जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे. जनलोकपाल विधेयकाला विरोध करणार्‍या खासदारांना आपण निवडणू देणार आहात का असा सवाल टीम अण्णांकडून लोकांना विचारला जाणार आहे. सरकार विरोधात रणशिंग फुंकणारी टीम अण्णाही आपल्या कामात अधिक पारदर्शकपणा आणणार आहे. याचं पहिलं पाऊल असणार आहे ते 1 एप्रिल ते 30 आतापर्यंत आंदोलनावर होणार खर्चाचं ऑडिट. हे ऑडिट आपल्या वेबसाईटवर प्रसिध्द करणार आहे. सोबतच टीम अण्णा समितीचे सर्व सदस्य आपल्या संपत्तीही वेबसाईटवर जाहीर करणार आहे. आणि कोणालाही टीम अण्णाच्या विरोधात कोणतीही तक्रार असेल तर त्याची चौकशी तीन निवृत्त न्यायधीश करतील अशी माहिती टीम अण्णांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2011 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close