S M L

वर्ध्यात सफाई कामगार संपावर ; शहरात घाणीचं साम्राज्य

12 सप्टेंबरवर्धा नगर परिषदेचे सफाई कामगार गेल्या 20 दिवसांपासून संपावर आहेत. संपामुळे वर्धा शहरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. शहरात ठिकठिकाणी कचरा साचला आहे. पावसाळ्यामुळे जिल्हात तापाची साथ पसरली आहे. त्यातचं कचरा साचल्याने साथीच्या रोगांचा धोकाही वाढला आहे. सहावा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच दोन महिन्याचं थकित वेतन देण्याची मागणी या कामगारांची आहे. नगर परिषदेच्या निवडणुका येत्या डिसेंबर महिन्यात होत आहे. त्यामुळे संपाकडे कुणाचंच लक्ष नाही. सफाई कामगारबरोबर कर्मचारीही संपावर गेले असल्यामुळे नगरपरिषदेत लोकांच्या कामाकडे कुणाचंच लक्ष नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2011 08:13 AM IST

वर्ध्यात सफाई कामगार संपावर ; शहरात घाणीचं साम्राज्य

12 सप्टेंबर

वर्धा नगर परिषदेचे सफाई कामगार गेल्या 20 दिवसांपासून संपावर आहेत. संपामुळे वर्धा शहरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. शहरात ठिकठिकाणी कचरा साचला आहे. पावसाळ्यामुळे जिल्हात तापाची साथ पसरली आहे. त्यातचं कचरा साचल्याने साथीच्या रोगांचा धोकाही वाढला आहे. सहावा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच दोन महिन्याचं थकित वेतन देण्याची मागणी या कामगारांची आहे. नगर परिषदेच्या निवडणुका येत्या डिसेंबर महिन्यात होत आहे. त्यामुळे संपाकडे कुणाचंच लक्ष नाही. सफाई कामगारबरोबर कर्मचारीही संपावर गेले असल्यामुळे नगरपरिषदेत लोकांच्या कामाकडे कुणाचंच लक्ष नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2011 08:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close