S M L

ठाण्यात महसूल अधिकार्‍यांचं लेखणी बंद आंदोलन

12 सप्टेंबरअतिक्रमणाची नोटिस बजावणा-या तलाठी ललित सातपुते यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ ठाणे जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आज काळ्या फिती लावून लेखणी बंद आंदोलन केलं. अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल गावात तलाठी ललीत सातपुते यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. ग्रामपंचायत सदस्य प्रकाश दुधकर यांनी सातपुते यांना लाथाबुक्क्यानं मारलं होतं. या मारहाणीत सातपुते हे गंभीर जखमी झाले होते. त्याचाच निषेध करत आज महसूल अधिकार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, महसूल कर्मचार्‍यांच्या या आंदोलनाचा सर्वसामान्य नागरिकांना मात्र फटका बसला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 12, 2011 07:03 AM IST

ठाण्यात महसूल अधिकार्‍यांचं लेखणी बंद आंदोलन

12 सप्टेंबर

अतिक्रमणाची नोटिस बजावणा-या तलाठी ललित सातपुते यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ ठाणे जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आज काळ्या फिती लावून लेखणी बंद आंदोलन केलं. अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल गावात तलाठी ललीत सातपुते यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. ग्रामपंचायत सदस्य प्रकाश दुधकर यांनी सातपुते यांना लाथाबुक्क्यानं मारलं होतं. या मारहाणीत सातपुते हे गंभीर जखमी झाले होते. त्याचाच निषेध करत आज महसूल अधिकार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, महसूल कर्मचार्‍यांच्या या आंदोलनाचा सर्वसामान्य नागरिकांना मात्र फटका बसला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2011 07:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close