S M L

राजाच्या खजिन्यातील सोन्याचांदीची मोजणी सुरू

13 सप्टेंबरगणेश विसर्जनानंतर आता लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी जे सोन्याचांदीचे दागिने दान केले आहेत त्या हुंडी आज उघडण्यात आल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी लालबागच्या राजाच्या खजिन्यात भरच पडली. यावर्षी पैशांच्या स्वरूपात लालबागच्या राजाला 6 कोटी 56 लाख रूपयांची देणगी मिळाली. याशिवाय एकूण चार हुंड्या सोन्याच्या आणि सात हुंड्या चांदीच्या भरलेल्या उघडण्यात येणार आहेत. यातल्या दोन हुंड्या आतापर्यंत उघडण्यात आल्या. या हुंड्यांमधील वैशिष्ट्य म्हणजे एक पाच लाखाचा हिरा आणि एक किलो सोन्याचं बिस्किट एका हुंडीत सापडलं आहे. राजाच्या या खजिन्याची मोजणी आणखी दोन दिवस सुरू राहणार आहे. या सर्व वस्तुंचा लिलाव शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2011 04:45 PM IST

राजाच्या खजिन्यातील सोन्याचांदीची मोजणी सुरू

13 सप्टेंबर

गणेश विसर्जनानंतर आता लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी जे सोन्याचांदीचे दागिने दान केले आहेत त्या हुंडी आज उघडण्यात आल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी लालबागच्या राजाच्या खजिन्यात भरच पडली. यावर्षी पैशांच्या स्वरूपात लालबागच्या राजाला 6 कोटी 56 लाख रूपयांची देणगी मिळाली. याशिवाय एकूण चार हुंड्या सोन्याच्या आणि सात हुंड्या चांदीच्या भरलेल्या उघडण्यात येणार आहेत. यातल्या दोन हुंड्या आतापर्यंत उघडण्यात आल्या. या हुंड्यांमधील वैशिष्ट्य म्हणजे एक पाच लाखाचा हिरा आणि एक किलो सोन्याचं बिस्किट एका हुंडीत सापडलं आहे. राजाच्या या खजिन्याची मोजणी आणखी दोन दिवस सुरू राहणार आहे. या सर्व वस्तुंचा लिलाव शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2011 04:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close