S M L

जाहिरातीत मराठी माणसांचा अपमान केला तर याद राखा - राज ठाकरे

14 सप्टेंबरमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहिरातदारांवर संतापून जाहीर पत्राद्वारे इशारा दिला आहे. जाहिरातींमधून मराठी माणसांचा अपमान केला तर याद राखा असा दमच त्यांनी या पत्रातून दिला आहे. टाटा डोकोमोच्या एका जाहिरातीमध्ये एक मराठी स्त्रीला मोलकरीण दाखवण्यात आलंय. ती मोबाईल चोरते, असं दृष्य त्यात आहे. यावर राज ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. इंग्रजाळलेल्या क्रिएटिव्ह माणसांमध्ये मराठी माणसाबद्दल द्वेष असल्याचंही ते म्हणाले. हे पत्र म्हणजे शेवटचा इशारा असल्याचं त्यांनी या पत्रात म्हंटलं आहे. यापुढे तोंडी किंवा लेखी भाषा नाही तर क्रिएटिव्ह पद्धतीनं वागू असा टोलाही त्यांनी लगावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2011 06:10 PM IST

जाहिरातीत मराठी माणसांचा अपमान केला तर याद राखा - राज ठाकरे

14 सप्टेंबर

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहिरातदारांवर संतापून जाहीर पत्राद्वारे इशारा दिला आहे. जाहिरातींमधून मराठी माणसांचा अपमान केला तर याद राखा असा दमच त्यांनी या पत्रातून दिला आहे. टाटा डोकोमोच्या एका जाहिरातीमध्ये एक मराठी स्त्रीला मोलकरीण दाखवण्यात आलंय. ती मोबाईल चोरते, असं दृष्य त्यात आहे. यावर राज ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. इंग्रजाळलेल्या क्रिएटिव्ह माणसांमध्ये मराठी माणसाबद्दल द्वेष असल्याचंही ते म्हणाले. हे पत्र म्हणजे शेवटचा इशारा असल्याचं त्यांनी या पत्रात म्हंटलं आहे. यापुढे तोंडी किंवा लेखी भाषा नाही तर क्रिएटिव्ह पद्धतीनं वागू असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2011 06:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close