S M L

पिंपरी चिंचवड पालिकेत पाणी प्रश्नी नगरसेवकांचा गोंधळ

13 सप्टेंबरपुण्यात पिंपरी-चिंचवड परिसरातला पाणी प्रश्न झपाट्याने पेटत चालला आहे. गेल्या चार महिन्यांपासून शहरातील अनेक भागात विस्कळीत पाणी पुरवठा होतोय. आणि त्याला फक्त महापौरच जबाबदार असल्याचा आरोप करत आज सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिकेत गोंधळ घातला. शहरातील ठराविक भागात जास्त पाणीपुरवठा होऊ नये म्हणून मुख्य जलवाहिनीवर सेन्सॉर मीटर बसवण्यात आलं आहे. महापौर योगेश बहल यांनी केवळ त्यांच्या वॉडमध्ये जास्तवेळ पाणीपुरवठा व्हावा यासाठीच अशाप्रकारे मीटर बसवले. त्यामुळे महापौर पाणी चोर असल्याचा आरोपही या नगरसेवकांनी केला. याबाबतचं निवेदन नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना दिलं. शहरातला पाणीपुरवठा पुढच्या 24 तासात सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या नगरसेवकांनी दिला. विशेष म्हणजे या आंदोलनात सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षातील नगरसेवकांचाही समावेश होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 13, 2011 02:40 PM IST

पिंपरी चिंचवड पालिकेत पाणी प्रश्नी नगरसेवकांचा गोंधळ

13 सप्टेंबर

पुण्यात पिंपरी-चिंचवड परिसरातला पाणी प्रश्न झपाट्याने पेटत चालला आहे. गेल्या चार महिन्यांपासून शहरातील अनेक भागात विस्कळीत पाणी पुरवठा होतोय. आणि त्याला फक्त महापौरच जबाबदार असल्याचा आरोप करत आज सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिकेत गोंधळ घातला. शहरातील ठराविक भागात जास्त पाणीपुरवठा होऊ नये म्हणून मुख्य जलवाहिनीवर सेन्सॉर मीटर बसवण्यात आलं आहे. महापौर योगेश बहल यांनी केवळ त्यांच्या वॉडमध्ये जास्तवेळ पाणीपुरवठा व्हावा यासाठीच अशाप्रकारे मीटर बसवले. त्यामुळे महापौर पाणी चोर असल्याचा आरोपही या नगरसेवकांनी केला. याबाबतचं निवेदन नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना दिलं. शहरातला पाणीपुरवठा पुढच्या 24 तासात सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या नगरसेवकांनी दिला. विशेष म्हणजे या आंदोलनात सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षातील नगरसेवकांचाही समावेश होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2011 02:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close