S M L

कांदा निर्यातबंदीचा फेरविचार !

14 सप्टेंबरकांदा निर्यातीवरच्या बंदीचा केंद्र सरकार फेरविचार करणार असल्याची माहिती आहे. कांद्या निर्यात बंदीचा फेरविचार करणार असल्याचे संकेत खाद्यमंत्री के.व्ही थॉमस यांनी दिले आहे. मंत्रिगटाच्या पुढच्या बैठकीत निर्णयाची शक्यता आहे. कांदा निर्यातबंदीचा निर्णय मंत्रिगटाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे बंदी उठवण्याचा निर्णयही मंत्रिगटाच्या बैठकीतच घेण्यात येईल. ही बैठक कधी होणार याबद्दल कळू शकलं नसलं तरी लवकरात लवकर ही बैठक होईल अशी माहिती मिळत आहे. राज्याचं एक शिष्टमंडळही कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत पोचलेलं आहे.दरम्यान निर्यातबंदीच्या विरोधात कांद्याची खरेदी विक्री ठप्प असल्याचा आजचा सहावा दिवस आहे. पाच लाख क्विंटल कांदा नाशिकमध्ये पडून आहे. यामुळे आतापर्यंत सुमारे 30 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गुरूवार, शुक्रवारी बाजारात नेण्यासाठी काढलेला हा कांदा आता सडायला लागला आहे. नाशिक विभागातल्या 14 बाजार समित्या गेल्या सहा दिवसांपासून बंद आहेत. दरम्यान नाशिकमध्ये ठिकठिकाणी आंदोलनं सुरूच आहेत. कळवणला तहसील कार्यालयासमोर शेतकरी उपोषणाला बसले आहेत तर नामपूरला शेतकर्‍यांचा मोर्चा आहे.महाराष्ट्रातल्या शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यानंतर आता शरद पवार पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. कांद्यावरची निर्यातबंदी हटवण्याची मागणी ते पंतप्रधानांना करतील, अशी माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे कांद्यावरची निर्यातबंदी लवकरात लवकर उठवावी यासाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनीही सांगितले आहे. आपण स्वत:सुद्धा संबंधित मंत्र्यांशी फोनवरुन बातचीत केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2011 11:09 AM IST

कांदा निर्यातबंदीचा फेरविचार !

14 सप्टेंबर

कांदा निर्यातीवरच्या बंदीचा केंद्र सरकार फेरविचार करणार असल्याची माहिती आहे. कांद्या निर्यात बंदीचा फेरविचार करणार असल्याचे संकेत खाद्यमंत्री के.व्ही थॉमस यांनी दिले आहे. मंत्रिगटाच्या पुढच्या बैठकीत निर्णयाची शक्यता आहे. कांदा निर्यातबंदीचा निर्णय मंत्रिगटाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे बंदी उठवण्याचा निर्णयही मंत्रिगटाच्या बैठकीतच घेण्यात येईल. ही बैठक कधी होणार याबद्दल कळू शकलं नसलं तरी लवकरात लवकर ही बैठक होईल अशी माहिती मिळत आहे. राज्याचं एक शिष्टमंडळही कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत पोचलेलं आहे.

दरम्यान निर्यातबंदीच्या विरोधात कांद्याची खरेदी विक्री ठप्प असल्याचा आजचा सहावा दिवस आहे. पाच लाख क्विंटल कांदा नाशिकमध्ये पडून आहे. यामुळे आतापर्यंत सुमारे 30 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गुरूवार, शुक्रवारी बाजारात नेण्यासाठी काढलेला हा कांदा आता सडायला लागला आहे. नाशिक विभागातल्या 14 बाजार समित्या गेल्या सहा दिवसांपासून बंद आहेत. दरम्यान नाशिकमध्ये ठिकठिकाणी आंदोलनं सुरूच आहेत. कळवणला तहसील कार्यालयासमोर शेतकरी उपोषणाला बसले आहेत तर नामपूरला शेतकर्‍यांचा मोर्चा आहे.

महाराष्ट्रातल्या शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यानंतर आता शरद पवार पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. कांद्यावरची निर्यातबंदी हटवण्याची मागणी ते पंतप्रधानांना करतील, अशी माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे कांद्यावरची निर्यातबंदी लवकरात लवकर उठवावी यासाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनीही सांगितले आहे. आपण स्वत:सुद्धा संबंधित मंत्र्यांशी फोनवरुन बातचीत केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2011 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close