S M L

बँकांच्या व्याजात पाव टक्क्याने वाढ

16 सप्टेंबरमहागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआय (RBI) ने वेळोवेळी पावलं उचलली आहेत. त्याचसाठी आज आरबीआयने पुन्हा एकदा कडक भूमिका स्वीकारली आहे. बँकांसाठीच्या व्याजदरांमध्ये आरबीआयने पाव टक्क्याने वाढ केली. परिणामी बँकांना आरबीआयकडून मिळणारा अर्थपुरवठा महागणार आहे. आता बँका हा भार स्वतः सोसतात की ग्राहकांवर याचा भार टाकतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. बँका होमलोनचे व्याजदर वाढवण्याबाबत काय निर्णय घेतात हे ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाचं असेल. 3 महिन्यांपूर्वीच सगळ्या बँकांनी होमलोनचे व्याजदर वाढवलेले असल्याने बँकांनी आतातरी याबाबत सावधगिरीची भूमिका घेतलेली आहे. दरम्यान जगभरातली आर्थिक परिस्थिती आणि शेअरबाजारांमधील अस्थिरता हा चिंतेचा विषय असल्याचे आरबीआयने म्हटलं आहे. आणि महागाई आटोक्यात येत नाही तोपर्यंत अशी दरवाढ करणं अपरिहार्य असल्याचं आरबीआयचं म्हणणं आहे. (रेपो रेट : ज्या दराने RBI बँकांना लहान कालावधीसाठी वित्तपुरवठा करते, तो दर )रेपो रेटजुना दर : 8.0%नवा दर :8.25%(रिव्हर्स रेपो रेट : ज्या दराने बँका आरबीआयकडे लहान कालावधीसाठी आपला पैसा ठेवू शकतात, तो दर)रिव्हर्स रेपो रेटजुना दर : 7.0%नवा दर : 7.25%प्रतिक्रिया- व्याजदर वाढल्यास विक्रीवर परिणाम होईल. पेट्रोल महागल्याचाही सणासुदीच्या काळातल्या विक्रीवर परिणाम होईल - मारुती- कर्जाचे दर वाढण्याची शक्यता, डिपॉझिटचा व्याजदर वाढ होणार नाही - बँक ऑफ इंडिया- 30 सप्टेंबरपर्यंत डिपॉझिट किंवा लोनचे दर बदलणार नाही - कॉर्पोरेशन बँक- या दरवाढीचा भार ग्राहकांवर टाकणार नाही - ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स- दरवाढीचा परिणाम लगेच होणार नाही - स्टेट बँक ऑफ इंडिया

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2011 09:28 AM IST

बँकांच्या व्याजात पाव टक्क्याने वाढ

16 सप्टेंबर

महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआय (RBI) ने वेळोवेळी पावलं उचलली आहेत. त्याचसाठी आज आरबीआयने पुन्हा एकदा कडक भूमिका स्वीकारली आहे. बँकांसाठीच्या व्याजदरांमध्ये आरबीआयने पाव टक्क्याने वाढ केली. परिणामी बँकांना आरबीआयकडून मिळणारा अर्थपुरवठा महागणार आहे.

आता बँका हा भार स्वतः सोसतात की ग्राहकांवर याचा भार टाकतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. बँका होमलोनचे व्याजदर वाढवण्याबाबत काय निर्णय घेतात हे ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाचं असेल. 3 महिन्यांपूर्वीच सगळ्या बँकांनी होमलोनचे व्याजदर वाढवलेले असल्याने बँकांनी आतातरी याबाबत सावधगिरीची भूमिका घेतलेली आहे. दरम्यान जगभरातली आर्थिक परिस्थिती आणि शेअरबाजारांमधील अस्थिरता हा चिंतेचा विषय असल्याचे आरबीआयने म्हटलं आहे. आणि महागाई आटोक्यात येत नाही तोपर्यंत अशी दरवाढ करणं अपरिहार्य असल्याचं आरबीआयचं म्हणणं आहे.

(रेपो रेट : ज्या दराने RBI बँकांना लहान कालावधीसाठी वित्तपुरवठा करते, तो दर )रेपो रेटजुना दर : 8.0%नवा दर :8.25%

(रिव्हर्स रेपो रेट : ज्या दराने बँका आरबीआयकडे लहान कालावधीसाठी आपला पैसा ठेवू शकतात, तो दर)रिव्हर्स रेपो रेटजुना दर : 7.0%नवा दर : 7.25%

प्रतिक्रिया- व्याजदर वाढल्यास विक्रीवर परिणाम होईल. पेट्रोल महागल्याचाही सणासुदीच्या काळातल्या विक्रीवर परिणाम होईल - मारुती- कर्जाचे दर वाढण्याची शक्यता, डिपॉझिटचा व्याजदर वाढ होणार नाही - बँक ऑफ इंडिया- 30 सप्टेंबरपर्यंत डिपॉझिट किंवा लोनचे दर बदलणार नाही - कॉर्पोरेशन बँक- या दरवाढीचा भार ग्राहकांवर टाकणार नाही - ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स- दरवाढीचा परिणाम लगेच होणार नाही - स्टेट बँक ऑफ इंडिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2011 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close