S M L

होमलोनही महागणार

16 सप्टेंबरपेट्रोलच्या दरात वाढ केल्यानंतर आता होमलोन महागण्याची शक्यता आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआय(RBI)ने वेळोवेळी पावलं उचलली आहेत. त्याचसाठी आज आरबीआयने पुन्हा एकदा कडक भूमिका स्वीकारली. बँकांसाठीच्या व्याजदरांमध्ये आरबीआयनं पाव टक्क्याने वाढ केली. त्यामुळे बँकांना आरबीआयकडून मिळणारा अर्थपुरवठा महागणार आहे. आता बँका हा भार स्वतः सोसतात की ग्राहकांवर याचा भार टाकतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. 9.78 टक्क्यांवर आलेला महागाईचा दर सतत होणारी इंधन दरवाढ आणि इंधन दरवाढीमुळे इतर गोष्टींच्या किंमती वाढण्याचं सत्र हे दुष्टचक्र काही संपत नाही. ही महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयने आज पुन्हा एकदा कडक पावलं उचलली. यामध्ये बँकांसाठीचे व्याजदर वाढवण्यात आले. आरबीआय ज्या दराने बँकांना कर्जपुरवठा करते तो रेपो रेट पाव टक्क्याने वाढून आता 8.25% झाला. तर ज्या दराने बँका आरबीआयकडे पैसा काही काळासाठी ठेवू शकतात तो दर आता 7.25% झाला. गेल्या 18 महिन्यांतली ही 12वी दरवाढ आहे. पण महागाई आटोक्यात आणण्यासाठी ही पावलं उचलणं गरजेचं असल्याचं अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी म्हटलं.जगभरातली आर्थिक स्थिती सध्या चिंताजनक असल्याचं खुद्द आरबीआयने म्हटलं आहे. पण या काळात आरबीआयने उचलेल्या पावलांचा परिणाम लवकरच पहायला मिळेल असं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण सामान्य माणसाला चिंता आहे ती त्याच्या होमलोनच्या व्याजदरांची. 3 महिन्यांपूर्वीच बहुतेक सगळ्या बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली होती. त्यामुळे येता सणासुदीचा काळ बघता बँकांनी सध्यापुरती सावधगिरीची भूमिका घेतलेली आहे. आरबीआयने दरवाढ केलेली असली तरी याचा भार आपण इतक्यातच ग्राहकांपर्यंत पोचवणार नसल्याचे एसबीआय (SBI), ओरियंटल बँक ऑफ कॉमर्ससारख्या बँकांनी म्हटलंय. तर तज्ज्ञांच्या मते जगभरातली बिघडलेली आर्थिक परिस्थिती आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा घसरलेला दर पाहता आरबीआयने आज केलेली दरवाढ ही शेवटची असू शकतेदुहेरी आकड्यांपर्यंत पोचलेला महागाईचा दर या आर्थिक वर्षांच्या अखेरपर्यंत आटोक्यात येण्याचा आरबीआयचा अंदाज आहे. पण त्याआधी सध्याच्या महागाईमध्ये भर पडेल ती इंधनाच्या वाढलेल्या किंमतींची. पेट्रोल महागल्याने पाठोपाठ होणारी वाहतूक खर्च, भाजीपाला यांच्यातली दरवाढ अटळ आहे. सणासुदीच्या काळानंतर बँकाही कर्जाचे व्याजदर वाढवतील. एलपीजी सिलेंडरचीही किंमत वाढण्याची टांगती तलवार आहेच. यासगळ्या चक्रातून महागाई नेमकी आटोक्यात कशी आणि कधी येणार हाच सवाल आहे. (रेपो रेट : ज्या दराने RBI बँकांना लहान कालावधीसाठी वित्तपुरवठा करते, तो दर )रेपो रेटजुना दर : 8.0%नवा दर :8.25%(रिव्हर्स रेपो रेट : ज्या दराने बँका आरबीआयकडे लहान कालावधीसाठी आपला पैसा ठेवू शकतात, तो दर)रिव्हर्स रेपो रेटजुना दर : 7.0%नवा दर : 7.25%प्रतिक्रिया- व्याजदर वाढल्यास विक्रीवर परिणाम होईल. पेट्रोल महागल्याचाही सणासुदीच्या काळातल्या विक्रीवर परिणाम होईल - मारुती- कर्जाचे दर वाढण्याची शक्यता, डिपॉझिटचा व्याजदर वाढ होणार नाही - बँक ऑफ इंडिया- 30 सप्टेंबरपर्यंत डिपॉझिट किंवा लोनचे दर बदलणार नाही - कॉर्पोरेशन बँक- या दरवाढीचा भार ग्राहकांवर टाकणार नाही - ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स- दरवाढीचा परिणाम लगेच होणार नाही - स्टेट बँक ऑफ इंडिया

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2011 09:53 AM IST

होमलोनही महागणार

16 सप्टेंबरपेट्रोलच्या दरात वाढ केल्यानंतर आता होमलोन महागण्याची शक्यता आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआय(RBI)ने वेळोवेळी पावलं उचलली आहेत. त्याचसाठी आज आरबीआयने पुन्हा एकदा कडक भूमिका स्वीकारली. बँकांसाठीच्या व्याजदरांमध्ये आरबीआयनं पाव टक्क्याने वाढ केली. त्यामुळे बँकांना आरबीआयकडून मिळणारा अर्थपुरवठा महागणार आहे. आता बँका हा भार स्वतः सोसतात की ग्राहकांवर याचा भार टाकतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.

9.78 टक्क्यांवर आलेला महागाईचा दर सतत होणारी इंधन दरवाढ आणि इंधन दरवाढीमुळे इतर गोष्टींच्या किंमती वाढण्याचं सत्र हे दुष्टचक्र काही संपत नाही. ही महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयने आज पुन्हा एकदा कडक पावलं उचलली. यामध्ये बँकांसाठीचे व्याजदर वाढवण्यात आले.

आरबीआय ज्या दराने बँकांना कर्जपुरवठा करते तो रेपो रेट पाव टक्क्याने वाढून आता 8.25% झाला. तर ज्या दराने बँका आरबीआयकडे पैसा काही काळासाठी ठेवू शकतात तो दर आता 7.25% झाला. गेल्या 18 महिन्यांतली ही 12वी दरवाढ आहे. पण महागाई आटोक्यात आणण्यासाठी ही पावलं उचलणं गरजेचं असल्याचं अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी म्हटलं.

जगभरातली आर्थिक स्थिती सध्या चिंताजनक असल्याचं खुद्द आरबीआयने म्हटलं आहे. पण या काळात आरबीआयने उचलेल्या पावलांचा परिणाम लवकरच पहायला मिळेल असं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

पण सामान्य माणसाला चिंता आहे ती त्याच्या होमलोनच्या व्याजदरांची. 3 महिन्यांपूर्वीच बहुतेक सगळ्या बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली होती. त्यामुळे येता सणासुदीचा काळ बघता बँकांनी सध्यापुरती सावधगिरीची भूमिका घेतलेली आहे. आरबीआयने दरवाढ केलेली असली तरी याचा भार आपण इतक्यातच ग्राहकांपर्यंत पोचवणार नसल्याचे एसबीआय (SBI), ओरियंटल बँक ऑफ कॉमर्ससारख्या बँकांनी म्हटलंय. तर तज्ज्ञांच्या मते जगभरातली बिघडलेली आर्थिक परिस्थिती आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा घसरलेला दर पाहता आरबीआयने आज केलेली दरवाढ ही शेवटची असू शकते

दुहेरी आकड्यांपर्यंत पोचलेला महागाईचा दर या आर्थिक वर्षांच्या अखेरपर्यंत आटोक्यात येण्याचा आरबीआयचा अंदाज आहे. पण त्याआधी सध्याच्या महागाईमध्ये भर पडेल ती इंधनाच्या वाढलेल्या किंमतींची. पेट्रोल महागल्याने पाठोपाठ होणारी वाहतूक खर्च, भाजीपाला यांच्यातली दरवाढ अटळ आहे. सणासुदीच्या काळानंतर बँकाही कर्जाचे व्याजदर वाढवतील. एलपीजी सिलेंडरचीही किंमत वाढण्याची टांगती तलवार आहेच. यासगळ्या चक्रातून महागाई नेमकी आटोक्यात कशी आणि कधी येणार हाच सवाल आहे.

(रेपो रेट : ज्या दराने RBI बँकांना लहान कालावधीसाठी वित्तपुरवठा करते, तो दर )रेपो रेटजुना दर : 8.0%नवा दर :8.25%

(रिव्हर्स रेपो रेट : ज्या दराने बँका आरबीआयकडे लहान कालावधीसाठी आपला पैसा ठेवू शकतात, तो दर)रिव्हर्स रेपो रेटजुना दर : 7.0%नवा दर : 7.25%

प्रतिक्रिया- व्याजदर वाढल्यास विक्रीवर परिणाम होईल. पेट्रोल महागल्याचाही सणासुदीच्या काळातल्या विक्रीवर परिणाम होईल - मारुती- कर्जाचे दर वाढण्याची शक्यता, डिपॉझिटचा व्याजदर वाढ होणार नाही - बँक ऑफ इंडिया- 30 सप्टेंबरपर्यंत डिपॉझिट किंवा लोनचे दर बदलणार नाही - कॉर्पोरेशन बँक- या दरवाढीचा भार ग्राहकांवर टाकणार नाही - ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स- दरवाढीचा परिणाम लगेच होणार नाही - स्टेट बँक ऑफ इंडिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2011 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close