S M L

अजित पवारांचा भाजप फोडण्याचा प्रयत्न - मुंडे

16 सप्टेंबरउपमुख्यमंत्री अजित पवार भाजप फोडण्याचा प्रयत्न करताहेत असा थेट आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केला. दुसरे पक्ष फोडण्यापेक्षा त्यांनी विकासावर लक्षं द्यावे असा टोला गोपीनाथ मुंडे यांनी लगावला. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं त्यांनी राज्याला दूरदृष्टी देण्याचा प्रयत्न करावा जिल्ह्यापातळीवर जाऊन नेत्यांच्या घरात फोड पाडू नये असं ही मुंडे म्हणाले. मुंडे यांचे जावई मधुसुधन केंद्रे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. त्याचबरोबर धनंजय मुंडे भाजप सोडणार या प्रकरणावर खुद्द मुंडेंनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. धनंजय मुंडे भाजप सोडणार नाही अशी माहिती भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी दिली. तर मधुसुदन केंद्रेंची जिल्हाध्यक्ष बदलण्याची मागणी मान्य केली आहे. तरी ते राष्ट्रवादीत जाणार असतीलं तर आपण काही करु शकत नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2011 11:50 AM IST

अजित पवारांचा भाजप फोडण्याचा प्रयत्न - मुंडे

16 सप्टेंबर

उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप फोडण्याचा प्रयत्न करताहेत असा थेट आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केला. दुसरे पक्ष फोडण्यापेक्षा त्यांनी विकासावर लक्षं द्यावे असा टोला गोपीनाथ मुंडे यांनी लगावला. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं त्यांनी राज्याला दूरदृष्टी देण्याचा प्रयत्न करावा जिल्ह्यापातळीवर जाऊन नेत्यांच्या घरात फोड पाडू नये असं ही मुंडे म्हणाले. मुंडे यांचे जावई मधुसुधन केंद्रे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. त्याचबरोबर धनंजय मुंडे भाजप सोडणार या प्रकरणावर खुद्द मुंडेंनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. धनंजय मुंडे भाजप सोडणार नाही अशी माहिती भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी दिली. तर मधुसुदन केंद्रेंची जिल्हाध्यक्ष बदलण्याची मागणी मान्य केली आहे. तरी ते राष्ट्रवादीत जाणार असतीलं तर आपण काही करु शकत नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2011 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close