S M L

भारताची पाटी कोरीच ; 5 व्या स्थानावर टीम इंडिया

17 सप्टेंबरवर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमला इंग्लंड दौर्‍यात मानहानिकारक पराभवाला सामोरं जावं लागलं आहेत. भारत आणि इंग्लंडदरम्यान कार्डिफमध्ये झालेल्या शेवटच्या वन डे मॅचमध्येही भारताला पराभवाला सामोरं जावं लागलंय. या पराभवामुळे इंग्लंड दौर्‍यात भारताच्या विजयाची पाटी कोरीच राहिली. टेस्ट, टी-20 आणि वन डे क्रिकेटमध्येही भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. कार्डिफ वन डेत भारताने 304 रन्स केले. याला उत्तर देताना इंग्लंडनंही दमदार सुरुवात केली. पण पावसाच्या व्यत्ययाने इंग्लंडसमोर 34 ओव्हरमध्ये 240 रन्सचं नवं टार्गेट ठेवण्यात आलं. हे टार्गेट इंग्लंडने 32 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावत पूर्ण केलं. या पराभवामुळे शेवटची वन डे मॅच खेळणार्‍या राहुल द्रविडला टीम इंडिया विजयाची भेट देऊ शकली नाही. वन डेतल्या पराभवाचा भारतीय टीमला क्रमवारीतही मोठा फटका बसला आहे. आता वन डे क्रमवारीत भारताची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. गेल्या तीन वर्षात भारताची ही सर्वात खालची क्रमवारी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2011 10:12 AM IST

भारताची पाटी कोरीच ; 5 व्या स्थानावर टीम इंडिया

17 सप्टेंबर

वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमला इंग्लंड दौर्‍यात मानहानिकारक पराभवाला सामोरं जावं लागलं आहेत. भारत आणि इंग्लंडदरम्यान कार्डिफमध्ये झालेल्या शेवटच्या वन डे मॅचमध्येही भारताला पराभवाला सामोरं जावं लागलंय. या पराभवामुळे इंग्लंड दौर्‍यात भारताच्या विजयाची पाटी कोरीच राहिली. टेस्ट, टी-20 आणि वन डे क्रिकेटमध्येही भारताचा लाजिरवाणा पराभव झाला.

कार्डिफ वन डेत भारताने 304 रन्स केले. याला उत्तर देताना इंग्लंडनंही दमदार सुरुवात केली. पण पावसाच्या व्यत्ययाने इंग्लंडसमोर 34 ओव्हरमध्ये 240 रन्सचं नवं टार्गेट ठेवण्यात आलं. हे टार्गेट इंग्लंडने 32 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावत पूर्ण केलं. या पराभवामुळे शेवटची वन डे मॅच खेळणार्‍या राहुल द्रविडला टीम इंडिया विजयाची भेट देऊ शकली नाही. वन डेतल्या पराभवाचा भारतीय टीमला क्रमवारीतही मोठा फटका बसला आहे. आता वन डे क्रमवारीत भारताची पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. गेल्या तीन वर्षात भारताची ही सर्वात खालची क्रमवारी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2011 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close