S M L

खड्डे, ट्रॅफिकच्या विरोधात ऑनलाईन याचिका दाखल

16 सप्टेंबरखड्डे आणि ट्रॅफिक जॅम्सना वैतागलेल्या पुण्यातल्या हिंजवडी भागातल्या आयटी कंपन्यांमधल्या कर्मचार्‍यांनी खड्‌ड्यांविरोधात आंदोलनाचा एक अनोखा मार्ग शोधला आहे. हिंजवडीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांनी ऑनलाईन याचिका दाखल केली. आता तरी त्यांना जाग येऊन हा प्रश्न सोडवला जाईल अशी अपेक्षा हे कर्मचारी व्यक्त करत आहे. संजीवनी गेली सात वर्ष हिंजवडीमधील एका सॉफ्टवेअर कंपनी मध्ये काम करतेय. पण गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ऑफिसला येणं तिला अगदी नकोसं झालंय. याला कारणीभूत आहेत, इथले खड्डे आणि रोजचं ट्रॅफिक जाम. रोजच्या तासंतासांच्या ट्रॅफिक जामला वैतागून तिने शेवटी एक ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. या भागाच्या खासदार असणार्‍या सुप्रिया सुळेंच्या विरोधात. संजीवनी सारखेच अनेक जण या रोजच्या त्रासाला कंटाळले आहेत. पण दाद मागणार तरी कुणाकडे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. कारण हे सॉफ्टवेअर पार्क ज्यांच्या अखत्यारित येतं ते एमआयडीसी, पिंपरी चिंचवड महापालिका आणि ग्रामपंचायत एकमेकांकडे बोटं दाखवत आहे. कंटाळलेल्या सगळ्या आयटीमंडळीना या पिटिशनच्या माध्यमातून एक पर्याय मिळालाय. त्यामुळेच या पिटिशनला अत्यंत कमी दिवसांमध्ये भरघोस पाठिंबा मिळाला आहे. जवळपास 3 दिवसांमध्येच साडेतीन हजारांहुन अधिक लोकांनी या पिटिशनवर सह्या केल्या आहेत. आता हे आयटीची मंडळी वाट बघतायत ते आता तरी संबंधित सरकारी अधिकारी त्यांचा प्रश्न सोडवणार का याची.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2011 12:19 PM IST

खड्डे, ट्रॅफिकच्या विरोधात ऑनलाईन याचिका दाखल

16 सप्टेंबर

खड्डे आणि ट्रॅफिक जॅम्सना वैतागलेल्या पुण्यातल्या हिंजवडी भागातल्या आयटी कंपन्यांमधल्या कर्मचार्‍यांनी खड्‌ड्यांविरोधात आंदोलनाचा एक अनोखा मार्ग शोधला आहे. हिंजवडीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांनी ऑनलाईन याचिका दाखल केली. आता तरी त्यांना जाग येऊन हा प्रश्न सोडवला जाईल अशी अपेक्षा हे कर्मचारी व्यक्त करत आहे.

संजीवनी गेली सात वर्ष हिंजवडीमधील एका सॉफ्टवेअर कंपनी मध्ये काम करतेय. पण गेल्या सहा ते सात महिन्यांपासून ऑफिसला येणं तिला अगदी नकोसं झालंय. याला कारणीभूत आहेत, इथले खड्डे आणि रोजचं ट्रॅफिक जाम. रोजच्या तासंतासांच्या ट्रॅफिक जामला वैतागून तिने शेवटी एक ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. या भागाच्या खासदार असणार्‍या सुप्रिया सुळेंच्या विरोधात.

संजीवनी सारखेच अनेक जण या रोजच्या त्रासाला कंटाळले आहेत. पण दाद मागणार तरी कुणाकडे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. कारण हे सॉफ्टवेअर पार्क ज्यांच्या अखत्यारित येतं ते एमआयडीसी, पिंपरी चिंचवड महापालिका आणि ग्रामपंचायत एकमेकांकडे बोटं दाखवत आहे.

कंटाळलेल्या सगळ्या आयटीमंडळीना या पिटिशनच्या माध्यमातून एक पर्याय मिळालाय. त्यामुळेच या पिटिशनला अत्यंत कमी दिवसांमध्ये भरघोस पाठिंबा मिळाला आहे. जवळपास 3 दिवसांमध्येच साडेतीन हजारांहुन अधिक लोकांनी या पिटिशनवर सह्या केल्या आहेत. आता हे आयटीची मंडळी वाट बघतायत ते आता तरी संबंधित सरकारी अधिकारी त्यांचा प्रश्न सोडवणार का याची.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2011 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close