S M L

आग्य्रातील हॉस्पिटलमध्ये स्फोट ; 6 जखमी

17 सप्टेंबरआग्रामध्ये जय हॉस्पिटलमध्ये स्फोट झाला आहे. यास्फोटात सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. जखमींना याच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. हॉस्पिटलच्या रिसेप्शनजवळ एका बॅगेत हा स्फोट झाला असं सांगितलं जातंय. या स्फोटाची तीव्रता कमी होती. त्यामुळे मोठी हानी झाली नाही. हा गावठी बॉम्ब असण्याची शक्यता आहे. पण तपासानंतरच त्याबद्दल ठोस माहिती सांगितली जाईल असं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान एटीएस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार आज संध्याकाळी पाचच्या सुमारास हॉस्पिटलच्या रिसेप्शन काउंटरवर ठेवलेल्या एका बॅगेत हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता मात्र कमी होती. या स्फोटामुळे हॉस्पिटलच्या खिडक्या-दरवाज्यांवर असलेल्या काचा फुटल्या. हॉस्पिटल प्रशासनाच्या म्हणण्यानुसार एक व्यक्ती ही बॅग घेऊन आली होती. या स्फोटात सहा लोक जखमी झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2011 03:11 PM IST

आग्य्रातील हॉस्पिटलमध्ये स्फोट ; 6 जखमी

17 सप्टेंबर

आग्रामध्ये जय हॉस्पिटलमध्ये स्फोट झाला आहे. यास्फोटात सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. जखमींना याच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे. हॉस्पिटलच्या रिसेप्शनजवळ एका बॅगेत हा स्फोट झाला असं सांगितलं जातंय. या स्फोटाची तीव्रता कमी होती. त्यामुळे मोठी हानी झाली नाही. हा गावठी बॉम्ब असण्याची शक्यता आहे. पण तपासानंतरच त्याबद्दल ठोस माहिती सांगितली जाईल असं पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान एटीएस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.

प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार आज संध्याकाळी पाचच्या सुमारास हॉस्पिटलच्या रिसेप्शन काउंटरवर ठेवलेल्या एका बॅगेत हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता मात्र कमी होती. या स्फोटामुळे हॉस्पिटलच्या खिडक्या-दरवाज्यांवर असलेल्या काचा फुटल्या. हॉस्पिटल प्रशासनाच्या म्हणण्यानुसार एक व्यक्ती ही बॅग घेऊन आली होती. या स्फोटात सहा लोक जखमी झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2011 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close