S M L

मुंबई पालिकेचे कर्मचारी उद्यापासून संपावर

18 सप्टेंबरबृहनमुंबई महानगर पालिकेच्या कर्मचार्‍यांना सहावा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी बीएमसीचे कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत. कामगार नेते शरद राव यांनी या संपाची घोषणा केली आहे. उद्या रात्री नऊ वाजल्यापासून कामगार संपावर जाणार आहेत. या संपात 95 टक्के कर्मचारी सहभागी होतील, असा दावासुद्धा राव यांनी केला आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना टीबी झाला आहे यांचा भरणा काय आयुक्त सुबोधकुमार देणार आहेत का असा सवाल शरद राव यांनी उपस्थित केला. दरम्यान या संपाबाबत बीएमसी आयुक्त सुबोध कुमार यांच्याशी बोलणी करायला शरद राव यांनी स्पष्ट नकार दिला. अजित पवार किंवा उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी करावी अशी मागणी त्यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2011 01:38 PM IST

मुंबई पालिकेचे कर्मचारी उद्यापासून संपावर

18 सप्टेंबर

बृहनमुंबई महानगर पालिकेच्या कर्मचार्‍यांना सहावा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी बीएमसीचे कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत. कामगार नेते शरद राव यांनी या संपाची घोषणा केली आहे. उद्या रात्री नऊ वाजल्यापासून कामगार संपावर जाणार आहेत. या संपात 95 टक्के कर्मचारी सहभागी होतील, असा दावासुद्धा राव यांनी केला आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना टीबी झाला आहे यांचा भरणा काय आयुक्त सुबोधकुमार देणार आहेत का असा सवाल शरद राव यांनी उपस्थित केला. दरम्यान या संपाबाबत बीएमसी आयुक्त सुबोध कुमार यांच्याशी बोलणी करायला शरद राव यांनी स्पष्ट नकार दिला. अजित पवार किंवा उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी करावी अशी मागणी त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2011 01:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close