S M L

महापौर मॅरेथॉन स्पर्धेत दीपचंद शरणची बाजी

18 सप्टेंबरवसई-विरारमध्ये आज पहिली वहिली राज्यस्तरीय महापौर मॅरेथॉन स्पर्धा रंगली. या मॅरेथॉनमध्ये राज्यभरातील जवळपास 5 हजार धावपटुंनी भाग घेतला. पुरूष गटात पुण्यातल्या दीपचंद शरण याने 42 किलोमिटर अंतर दोन तास 28 मिनिटात पूर्ण करून पहिला क्रमांक पटकावला. वाशिमचा भास्कर कांबळे दुसर्‍या क्रमांकावर आला. त्याने हे अंतर 2तास 37 मिनिटात पार केलं. तर चंद्रपूरच्या निलेश बोंडेनं तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात किरण तिवारी हिनं पहिला क्रमांक पटकावला. तर स्पर्धेत ललिता बाबर दुसरी आणि संगीता यादव तिसरी आली. भारताची सुवर्णकन्या पी.टी.उषा या मॅरेथॉनची ब्रँड ऍम्बेसेडर आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2011 01:52 PM IST

महापौर मॅरेथॉन स्पर्धेत दीपचंद शरणची बाजी

18 सप्टेंबर

वसई-विरारमध्ये आज पहिली वहिली राज्यस्तरीय महापौर मॅरेथॉन स्पर्धा रंगली. या मॅरेथॉनमध्ये राज्यभरातील जवळपास 5 हजार धावपटुंनी भाग घेतला. पुरूष गटात पुण्यातल्या दीपचंद शरण याने 42 किलोमिटर अंतर दोन तास 28 मिनिटात पूर्ण करून पहिला क्रमांक पटकावला. वाशिमचा भास्कर कांबळे दुसर्‍या क्रमांकावर आला. त्याने हे अंतर 2तास 37 मिनिटात पार केलं. तर चंद्रपूरच्या निलेश बोंडेनं तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात किरण तिवारी हिनं पहिला क्रमांक पटकावला. तर स्पर्धेत ललिता बाबर दुसरी आणि संगीता यादव तिसरी आली. भारताची सुवर्णकन्या पी.टी.उषा या मॅरेथॉनची ब्रँड ऍम्बेसेडर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2011 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close