S M L

मुंडेंचा सल्ला, अजितदादांचा हल्ला ; आपलीच घरं नीट सांभाळा !

18 सप्टेंबरलोकांची घरं फोडू नका या गोपीनाथ मुंडेंच्या सल्ल्यावर अजित पवारांनी जोरदार हल्ला चढवला. आजपर्यंत तुम्ही इतरांची घरं फोडलीत तेव्हा आम्ही काहीच बोललो नाही. आधी आपली घरं नीट सांभाळा उगाच दुसर्‍याच्या नावाने बोलू नका असा जोरदार हल्ला अजित पवारांनी मुंडेंवर केला. मुंडेंचे जावई राष्ट्रवादीत जात आहेत. शिवाय मुंडेंचा पुतण्याही राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मुंडेंनी राजकारणासाठी दुसर्‍याची घरं फोडू नका असा सल्ला अजित पवार यांनी दिला होता. त्यावर आज अजित पवारांनी हा हल्ला चढवला.अजित पवार भाजप फोडण्याचा प्रयत्न करताहेत असा थेट आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केला होता. दुसरे पक्ष फोडण्यापेक्षा त्यांनी विकासावर लक्षं द्यावे असा टोलाही गोपीनाथ मुंडे यांनी लगावला होता. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं त्यांनी राज्याला दूरदृष्टी देण्याचा प्रयत्न करावा जिल्ह्यापातळीवर जाऊन नेत्यांच्या घरात फोड पाडू नये असा सल्लाही मुंडे यांनी दिला होता. मुंडेचे जावई आणि पुतणे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे अस वृत्त जाहीर होताच गोपीनाथ मुंडे यांनी थेट अजित पवारांवर आरोपाची फैरी झाडली. आज अजितदादांनी मंुडेंच्या विधानाचा समाचार घेत आधी आपली घरं नीट सांभाळा आधी आपली घरं नीट सांभाळा उगाच दुसर्‍याच्या नावाने बोलू नका असा जोरदार हल्ला अजित पवारांनी मुंडेंवर केला. जेव्हा मुंडे भाजप सोडण्याच्या वाटेवर होते तेव्हा कोणी यांचं घर थोडी फोडलं. जेव्हा आपण आपली घर नीट सांभाळात येत नाही तर दुसर्‍यांच्या घरावर टीका का करायची असा प्रतिहल्लाच अजिदादांनी चढवला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2011 04:42 PM IST

मुंडेंचा सल्ला, अजितदादांचा हल्ला ; आपलीच घरं नीट सांभाळा !

18 सप्टेंबर

लोकांची घरं फोडू नका या गोपीनाथ मुंडेंच्या सल्ल्यावर अजित पवारांनी जोरदार हल्ला चढवला. आजपर्यंत तुम्ही इतरांची घरं फोडलीत तेव्हा आम्ही काहीच बोललो नाही. आधी आपली घरं नीट सांभाळा उगाच दुसर्‍याच्या नावाने बोलू नका असा जोरदार हल्ला अजित पवारांनी मुंडेंवर केला. मुंडेंचे जावई राष्ट्रवादीत जात आहेत. शिवाय मुंडेंचा पुतण्याही राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मुंडेंनी राजकारणासाठी दुसर्‍याची घरं फोडू नका असा सल्ला अजित पवार यांनी दिला होता. त्यावर आज अजित पवारांनी हा हल्ला चढवला.

अजित पवार भाजप फोडण्याचा प्रयत्न करताहेत असा थेट आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केला होता. दुसरे पक्ष फोडण्यापेक्षा त्यांनी विकासावर लक्षं द्यावे असा टोलाही गोपीनाथ मुंडे यांनी लगावला होता. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं त्यांनी राज्याला दूरदृष्टी देण्याचा प्रयत्न करावा जिल्ह्यापातळीवर जाऊन नेत्यांच्या घरात फोड पाडू नये असा सल्लाही मुंडे यांनी दिला होता. मुंडेचे जावई आणि पुतणे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे अस वृत्त जाहीर होताच गोपीनाथ मुंडे यांनी थेट अजित पवारांवर आरोपाची फैरी झाडली. आज अजितदादांनी मंुडेंच्या विधानाचा समाचार घेत आधी आपली घरं नीट सांभाळा आधी आपली घरं नीट सांभाळा उगाच दुसर्‍याच्या नावाने बोलू नका असा जोरदार हल्ला अजित पवारांनी मुंडेंवर केला. जेव्हा मुंडे भाजप सोडण्याच्या वाटेवर होते तेव्हा कोणी यांचं घर थोडी फोडलं. जेव्हा आपण आपली घर नीट सांभाळात येत नाही तर दुसर्‍यांच्या घरावर टीका का करायची असा प्रतिहल्लाच अजिदादांनी चढवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2011 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close