S M L

मोदींच्या उपोषणावर शिवसेनेची टीका

19 सप्टेंबरशिवसेनेने आपल्या मुखपत्रातून भाजप आणि मोदींवर टीका केली.गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी सद्भावना उपवासानिमित्त भेटीला गेलेले भाजपचे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांच्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका करण्यात आली. मोदींच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे अहमदाबादला गेले होते. तेव्हा महाराष्ट्र अंधारात बुडाल्याचं वक्तव्य खडसेंनी केलं होतं. त्यावर सामनाच्या अग्रलेखात आक्षेप घेण्यात आला. खडसे हे भाजपचे असले तरी महाराष्ट्राचे नेते आहेत व महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याने परराज्यात जाऊन स्वराज्याची बदनामी करू नये असे आम्हाला वाटते. 'गुजरातच्या प्रगतीपुढे महाराष्ट्र फिका आहे. गुजरात म्हणजे प्रकाश व महाराष्ट्र म्हणजे अंधार आहे' असे एक विधान त्यांनी मोदी यांच्या उपोषण-मंचावरून केले. हे सत्य असले तरी दुसर्‍या राज्यात जाऊन अशी विधाने करणे व आपल्याच राज्याच्या तोंडास काळे फासण्याचे प्रकार थांबले तर बरे होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 19, 2011 09:53 AM IST

मोदींच्या उपोषणावर शिवसेनेची टीका

19 सप्टेंबर

शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून भाजप आणि मोदींवर टीका केली.गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी सद्भावना उपवासानिमित्त भेटीला गेलेले भाजपचे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांच्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका करण्यात आली. मोदींच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे अहमदाबादला गेले होते. तेव्हा महाराष्ट्र अंधारात बुडाल्याचं वक्तव्य खडसेंनी केलं होतं. त्यावर सामनाच्या अग्रलेखात आक्षेप घेण्यात आला. खडसे हे भाजपचे असले तरी महाराष्ट्राचे नेते आहेत व महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याने परराज्यात जाऊन स्वराज्याची बदनामी करू नये असे आम्हाला वाटते. 'गुजरातच्या प्रगतीपुढे महाराष्ट्र फिका आहे. गुजरात म्हणजे प्रकाश व महाराष्ट्र म्हणजे अंधार आहे' असे एक विधान त्यांनी मोदी यांच्या उपोषण-मंचावरून केले. हे सत्य असले तरी दुसर्‍या राज्यात जाऊन अशी विधाने करणे व आपल्याच राज्याच्या तोंडास काळे फासण्याचे प्रकार थांबले तर बरे होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2011 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close