S M L

नमकहराम जनावरापेक्षा फोटोग्राफी बरी - उध्दव ठाकरे

20 सप्टेंबरनमकहराम जनावरापेक्षा जंगलातल्या इमानी जनावरांचे फोटो काढण्यात खरा आनंद आहे. काही जनावरांना फालतू बकबक आणि बकवास करण्याशिवाय दुसरा कोणताही धंदा राहिलेला नाही. काही लोकांना फुकटचे सल्ले देऊन प्रसिध्दी मिळवण्याचा रोग जडला आहे. त्यांच्या फालतू बकबकीकडे आपण लक्ष देत नाही, आणि महाराष्ट्राची जनताही लक्ष देणार नाही याची मला खात्री आहे अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर हल्ला चढवला. परराज्यात जाऊन प्राण्यांचे फोटो काढण्यापेक्षा मुंबईतील रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांचे फोटो काढा,असा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला होता. आता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलंय. काही लोकांना फुकटचे सल्ले देऊन प्रसिध्दी मिळवण्याचा रोग जडला आहे. त्यांच्या फालतू बकबकीकडे आपण लक्ष देत नाही, आणि महाराष्ट्राची जनताही लक्ष देणार नाही याची मला खात्री आहे असं उध्दव ठाकरे ठाकरे यांनी म्हटलं आहे. उध्दव ठाकरे यांनी पत्रक काढून राज ठाकरे यांना उत्तर दिलंय. मराठी माणसांच्या एकीत विघ्न आणि खड्डा पाडण्याचे काम करणा-यांना कॅमेरातील माणुसकी आणि मुक्या प्राण्यांचे प्रेम काय समजणार ज्या घरात वाढलात, मोठे झालात, 'माँ'ने खाऊ पिऊ घातलं त्याच घरात बेईमानी करणार्‍यांविषयी न बोललेच बरे या शब्दात उद्धव ठाकरेंनी टीका केली. उद्धव यांचं राजना उत्तर'काही लोकांना फुकटचे सल्ले देऊन प्रसिद्धी मिळवण्याचा रोग जडलाय. त्यांच्या फालतू बकबकीकडे मी लक्ष देत नाही आणि महाराष्ट्राची जनताही लक्ष देणार नाही, याची मला खात्री आहे. हे असले फुकटचे सल्ले मला देण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या अंतरंगातले कपटी खड्डे आधी पाहावेत. मराठी माणसांच्या एकीत विघ्न आणि 'खड्डा' पाडण्याचे पाप करणार्‍यांना कॅमेर्‍यातली माणुसकी आणि मुक्या प्राण्यांचं प्रेम काय समजणार ? ज्या घरात आपण वाढलात, मोठे झालात, 'माँ'ने खाऊपिऊ घातलं, त्याच घरात बेईमानी करणार्‍यांविषयी न बोललेलंच बरं. अशा नमकहराम जनावरापेक्षा जंगलातल्या इमानी जनावरांचे फोटो काढण्यात खरा आनंद आहे. काही जनावरांना फालतू बकबक आणि बकवास करण्याशिवाय दुसरा कोणताही धंदा राहिलेला नाही. फुकटचे सल्ले द्यायचे. बिल्डरांचा गोतावळा घेऊन महापालिकेच्या आयुक्तांना भेटायचे. चांगल्या चाललेल्या कामात टांग टाकायची आणि स्वतःचे काहीच कर्तृत्व नसले तरी 'स्व-कर्तृत्वा'नं मोठ्या झालेल्या व्यक्तींना भेटून त्यांच्याबरोबर फोटो काढून फुकटची प्रसिद्धी मिळवायची. ते जमले नाही तर कर्तबगार माणसांवर चिखलफेक करून लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं, अशा फुकट्यांनी महाराष्ट्रीची जी बदनामी केलीय, तो खड्डा कधीच भरून निघणार नाही.' - उद्धव ठाकरे

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2011 11:58 AM IST

नमकहराम जनावरापेक्षा फोटोग्राफी बरी - उध्दव ठाकरे

20 सप्टेंबर

नमकहराम जनावरापेक्षा जंगलातल्या इमानी जनावरांचे फोटो काढण्यात खरा आनंद आहे. काही जनावरांना फालतू बकबक आणि बकवास करण्याशिवाय दुसरा कोणताही धंदा राहिलेला नाही. काही लोकांना फुकटचे सल्ले देऊन प्रसिध्दी मिळवण्याचा रोग जडला आहे. त्यांच्या फालतू बकबकीकडे आपण लक्ष देत नाही, आणि महाराष्ट्राची जनताही लक्ष देणार नाही याची मला खात्री आहे अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर हल्ला चढवला.

परराज्यात जाऊन प्राण्यांचे फोटो काढण्यापेक्षा मुंबईतील रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांचे फोटो काढा,असा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला होता. आता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलंय. काही लोकांना फुकटचे सल्ले देऊन प्रसिध्दी मिळवण्याचा रोग जडला आहे. त्यांच्या फालतू बकबकीकडे आपण लक्ष देत नाही, आणि महाराष्ट्राची जनताही लक्ष देणार नाही याची मला खात्री आहे असं उध्दव ठाकरे ठाकरे यांनी म्हटलं आहे. उध्दव ठाकरे यांनी पत्रक काढून राज ठाकरे यांना उत्तर दिलंय. मराठी माणसांच्या एकीत विघ्न आणि खड्डा पाडण्याचे काम करणा-यांना कॅमेरातील माणुसकी आणि मुक्या प्राण्यांचे प्रेम काय समजणार ज्या घरात वाढलात, मोठे झालात, 'माँ'ने खाऊ पिऊ घातलं त्याच घरात बेईमानी करणार्‍यांविषयी न बोललेच बरे या शब्दात उद्धव ठाकरेंनी टीका केली. उद्धव यांचं राजना उत्तर

'काही लोकांना फुकटचे सल्ले देऊन प्रसिद्धी मिळवण्याचा रोग जडलाय. त्यांच्या फालतू बकबकीकडे मी लक्ष देत नाही आणि महाराष्ट्राची जनताही लक्ष देणार नाही, याची मला खात्री आहे. हे असले फुकटचे सल्ले मला देण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या अंतरंगातले कपटी खड्डे आधी पाहावेत. मराठी माणसांच्या एकीत विघ्न आणि 'खड्डा' पाडण्याचे पाप करणार्‍यांना कॅमेर्‍यातली माणुसकी आणि मुक्या प्राण्यांचं प्रेम काय समजणार ? ज्या घरात आपण वाढलात, मोठे झालात, 'माँ'ने खाऊपिऊ घातलं, त्याच घरात बेईमानी करणार्‍यांविषयी न बोललेलंच बरं. अशा नमकहराम जनावरापेक्षा जंगलातल्या इमानी जनावरांचे फोटो काढण्यात खरा आनंद आहे.

काही जनावरांना फालतू बकबक आणि बकवास करण्याशिवाय दुसरा कोणताही धंदा राहिलेला नाही. फुकटचे सल्ले द्यायचे. बिल्डरांचा गोतावळा घेऊन महापालिकेच्या आयुक्तांना भेटायचे. चांगल्या चाललेल्या कामात टांग टाकायची आणि स्वतःचे काहीच कर्तृत्व नसले तरी 'स्व-कर्तृत्वा'नं मोठ्या झालेल्या व्यक्तींना भेटून त्यांच्याबरोबर फोटो काढून फुकटची प्रसिद्धी मिळवायची. ते जमले नाही तर कर्तबगार माणसांवर चिखलफेक करून लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं, अशा फुकट्यांनी महाराष्ट्रीची जी बदनामी केलीय, तो खड्डा कधीच भरून निघणार नाही.'

- उद्धव ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2011 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close