S M L

अटकेच्या भीतीने मारूती नवले पुन्हा गायब

अद्वैत मेहता, पुणे20 सप्टेंबरपवन गांधी ट्रस्ट फसवणूक प्रकरणी हायकोर्टाने जामीन नाकारल्यानंतर सिंहगड संस्थेचे संस्थापक मारूती नवले आता नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांनी नवलेंना अटक करण्यासाठी पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू केली आहे. या अगोदरही नवले पोलिसांना हुलकावणी देत गायब झाले होते.पुणे- पौड रस्त्यावरच्या अंबडवेट इथल्या पवन गांधी ट्रस्टची साडेअकरा एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न मारूती नवलेंच्या चांगलाच अंगलट आला. कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारताना नवलेंनी कागदपत्रात खाडाखोड केल्याचे म्हटलं आहे. तसेच सुप्रीम कोर्टात जाण्याकरता नवलेंच्या वकिलांनी मागितलेली मुदतही कोर्टाने नाकारली. कोर्टात गैरहजर असलेले नवले आता गायब झालेत आणि आता पोलीस त्यांच्या मागावर आहेत.नवलेंचा घरी तसेच कार्यालयात ठावठिकाणा नसला तरी पोलिसांना विश्वास आहे की नवले गजाआड होतीलच. त्याकरता पोलिसांनी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकरणातील फिर्यादी चैनसुख गांधी यांना कोर्टाच्या निर्णयाने दिलासा मिळाला आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवले आता सुप्रीम कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहेत. अटक टाळण्याकरता ते आटोकाट प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच ते गायब झाले आहेत. आता किती काळ नवले पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरतात ते पहायचंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2011 03:19 PM IST

अटकेच्या भीतीने मारूती नवले पुन्हा गायब

अद्वैत मेहता, पुणे

20 सप्टेंबर

पवन गांधी ट्रस्ट फसवणूक प्रकरणी हायकोर्टाने जामीन नाकारल्यानंतर सिंहगड संस्थेचे संस्थापक मारूती नवले आता नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांनी नवलेंना अटक करण्यासाठी पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू केली आहे. या अगोदरही नवले पोलिसांना हुलकावणी देत गायब झाले होते.

पुणे- पौड रस्त्यावरच्या अंबडवेट इथल्या पवन गांधी ट्रस्टची साडेअकरा एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न मारूती नवलेंच्या चांगलाच अंगलट आला. कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारताना नवलेंनी कागदपत्रात खाडाखोड केल्याचे म्हटलं आहे. तसेच सुप्रीम कोर्टात जाण्याकरता नवलेंच्या वकिलांनी मागितलेली मुदतही कोर्टाने नाकारली. कोर्टात गैरहजर असलेले नवले आता गायब झालेत आणि आता पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

नवलेंचा घरी तसेच कार्यालयात ठावठिकाणा नसला तरी पोलिसांना विश्वास आहे की नवले गजाआड होतीलच. त्याकरता पोलिसांनी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकरणातील फिर्यादी चैनसुख गांधी यांना कोर्टाच्या निर्णयाने दिलासा मिळाला आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवले आता सुप्रीम कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहेत. अटक टाळण्याकरता ते आटोकाट प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच ते गायब झाले आहेत. आता किती काळ नवले पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरतात ते पहायचंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2011 03:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close