S M L

टीम इंडियाचं पोस्टमॉर्टम टळलं !

20 सप्टेंबरभारतीय क्रिकेट बोर्डाची 82 वी वार्षिक दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत भारतीय टीमच्या निराशाजनक कामगिरीचं पोस्टमॉर्टेम होईल अशी अपेक्षा होती. पण बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी भारतीय टीमची पाठराखणच केली. इंग्लंड दौर्‍यात भारतीय टीमला एकही विजय मिळवता आला नव्हता. पण एक दौरा वाईट गेल्याने टीमवर ताबडतोब कारवाई करणे योग्य ठरणार नाही असं श्रीनिवासनं यांनी म्हटलं. टेस्ट क्रिकेटमधील अव्वल स्थान मिळवण्यासाठी टीम नक्कीच प्रयत्न करेल आणि पुन्हा आम्ही ते पुन्हा एकदा काबीज करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2011 05:04 PM IST

टीम इंडियाचं पोस्टमॉर्टम टळलं !

20 सप्टेंबर

भारतीय क्रिकेट बोर्डाची 82 वी वार्षिक दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत भारतीय टीमच्या निराशाजनक कामगिरीचं पोस्टमॉर्टेम होईल अशी अपेक्षा होती. पण बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी भारतीय टीमची पाठराखणच केली. इंग्लंड दौर्‍यात भारतीय टीमला एकही विजय मिळवता आला नव्हता. पण एक दौरा वाईट गेल्याने टीमवर ताबडतोब कारवाई करणे योग्य ठरणार नाही असं श्रीनिवासनं यांनी म्हटलं. टेस्ट क्रिकेटमधील अव्वल स्थान मिळवण्यासाठी टीम नक्कीच प्रयत्न करेल आणि पुन्हा आम्ही ते पुन्हा एकदा काबीज करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2011 05:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close