S M L

हायड्रोजन सल्फाईडच्या गळतीमुळे 4 कामगारांचा मृत्यू

21 सप्टेंबरठाणे जिल्ह्यातील तारापूरमधील एमआयडीसीतील एका कंपनीत काल रात्री वायुगळती झाली. या वायुगळतीत 4 कामगारांचा मृत्यू झाला. तर 3 जण गंभीर आहेत. एमआयडीसीतील सिक्वेंट सायंटिफिक लिमिटेड कंपनीतली ही घटना आहे. दुसर्‍या शिफ्टचं काम सुरू असतानाच हायड्रोजन सल्फाईड या वायूची गळती व्हायला सुरुवात झाली. त्यावेळी कंपनीत 16 कामगार हजर होते. त्यापैकी 4 कामगारांचा वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. तर 3 जण गंभीर आहेत. त्यांच्यासह बाधा झालेल्या 10 कामगारांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलंय. बोईसरमधील खासगी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. वायुगळती थांबली असली तरी सरकारी यंत्रणांनी सावधानतेचा इशारा दिला. दरम्यान याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजरसह तिघांनाअटक करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2011 10:43 AM IST

हायड्रोजन सल्फाईडच्या गळतीमुळे 4 कामगारांचा मृत्यू

21 सप्टेंबर

ठाणे जिल्ह्यातील तारापूरमधील एमआयडीसीतील एका कंपनीत काल रात्री वायुगळती झाली. या वायुगळतीत 4 कामगारांचा मृत्यू झाला. तर 3 जण गंभीर आहेत. एमआयडीसीतील सिक्वेंट सायंटिफिक लिमिटेड कंपनीतली ही घटना आहे. दुसर्‍या शिफ्टचं काम सुरू असतानाच हायड्रोजन सल्फाईड या वायूची गळती व्हायला सुरुवात झाली. त्यावेळी कंपनीत 16 कामगार हजर होते. त्यापैकी 4 कामगारांचा वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. तर 3 जण गंभीर आहेत. त्यांच्यासह बाधा झालेल्या 10 कामगारांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलंय. बोईसरमधील खासगी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. वायुगळती थांबली असली तरी सरकारी यंत्रणांनी सावधानतेचा इशारा दिला. दरम्यान याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजरसह तिघांनाअटक करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2011 10:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close