S M L

चिदंबरम रोखू शकत होते 2 जी घोटाळा !

21 सप्टेंबर2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याने आता गंभीर वळण घेतलं आहे. इतके दिवस द्रमुकला हादरवणार्‍या या प्रकरणामुळे केंद्र सरकारमधल्या सर्वोच्च नेतृत्वातली दुफळी पुढे आली. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात तेव्हाचे अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी भूमिका निभावली होती अशी माहिती देणारं महत्त्वाचं सरकारी पत्र पुढे आलंय. विशेष म्हणजे हे पत्र सध्याचे अर्थमंत्री प्रणव मुखजीर्ंनी लिहिलं आहे. प्रणव मुखजीर्ंनी पंतप्रधानांना हे पत्र 25 मार्च 2011 च्या दिवशी लिहिलं होतं. त्यात मुखर्जी लिहितात की चिदंबरम यांची इच्छा असती, तर ते 2 जी चे चुकीच्या पद्धतीनं दिले जाणारे परवाने रोखू शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. हे पत्र सुब्रमण्यम स्वामी यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळवलंय. स्वामी हे स्पेक्ट्रम केसचे याचिकाकर्ते असून त्यांनी हे पत्र चिदंबरम यांच्याविरोधात पुरावा म्हणून कोर्टात सादर केलं.प्रणव मुखर्जी यांच्या चिठ्ठीत काय म्हटलं होतं ?- स्पेक्ट्रमचा लिलाव व्हावा, या जुन्या मागणीवर चिदंबरम ठाम राहिले असते, तर ए राजांना 2 जीचे परवाने रद्द करावेच लागले असते- 4.4 मेगाहर्ट्झच्या 'स्टार्ट अप' स्पेक्ट्रमसाठी खाजगी कंपन्यांकडून एकही पैसा घेऊ नये, याबाबत ए राजा आणि चिदंबरम यांच्यात एकमत होतं- 2008 साली चिदंबरम यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सांगितलं होतं की तेव्हापर्यंत झालेल्या स्पेक्ट्रम व्यवहारांवर पुढे चर्चा करू नये- एप्रिल 2008 मध्ये चिदंबरम स्वतःच्याच अर्थमंत्रालयाच्या अहवालाच्या विरोधात गेले आणि राजांच्या 2 जी धोरणाला 'तत्त्वतः' पाठिंबा दिलाअनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. 2 जी: अनुत्तरित प्रश्न- 2 जी घोटाळ्याबाबत चिंदबरमना एकट्याला टार्गेट करण्याचा प्रणव मुखर्जी प्रयत्न करतायत का ?- प्रणव मुखजीर्ंकडे चिदंबरम यांच्याविरोधात पुरावे होते, तर कॅगला दिलेल्या उत्तरात त्यांनी क्लीन चिट का दिली ?- पंतप्रधान, प्रणव मुखजीर्ंनाही या व्यवहारांची कल्पना होती, तर ते राजांना थांबवू शकले नसते का ?

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2011 05:22 PM IST

चिदंबरम रोखू शकत होते 2 जी घोटाळा !

21 सप्टेंबर

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याने आता गंभीर वळण घेतलं आहे. इतके दिवस द्रमुकला हादरवणार्‍या या प्रकरणामुळे केंद्र सरकारमधल्या सर्वोच्च नेतृत्वातली दुफळी पुढे आली. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात तेव्हाचे अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी भूमिका निभावली होती अशी माहिती देणारं महत्त्वाचं सरकारी पत्र पुढे आलंय.

विशेष म्हणजे हे पत्र सध्याचे अर्थमंत्री प्रणव मुखजीर्ंनी लिहिलं आहे. प्रणव मुखजीर्ंनी पंतप्रधानांना हे पत्र 25 मार्च 2011 च्या दिवशी लिहिलं होतं. त्यात मुखर्जी लिहितात की चिदंबरम यांची इच्छा असती, तर ते 2 जी चे चुकीच्या पद्धतीनं दिले जाणारे परवाने रोखू शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. हे पत्र सुब्रमण्यम स्वामी यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळवलंय. स्वामी हे स्पेक्ट्रम केसचे याचिकाकर्ते असून त्यांनी हे पत्र चिदंबरम यांच्याविरोधात पुरावा म्हणून कोर्टात सादर केलं.

प्रणव मुखर्जी यांच्या चिठ्ठीत काय म्हटलं होतं ?

- स्पेक्ट्रमचा लिलाव व्हावा, या जुन्या मागणीवर चिदंबरम ठाम राहिले असते, तर ए राजांना 2 जीचे परवाने रद्द करावेच लागले असते- 4.4 मेगाहर्ट्झच्या 'स्टार्ट अप' स्पेक्ट्रमसाठी खाजगी कंपन्यांकडून एकही पैसा घेऊ नये, याबाबत ए राजा आणि चिदंबरम यांच्यात एकमत होतं- 2008 साली चिदंबरम यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सांगितलं होतं की तेव्हापर्यंत झालेल्या स्पेक्ट्रम व्यवहारांवर पुढे चर्चा करू नये- एप्रिल 2008 मध्ये चिदंबरम स्वतःच्याच अर्थमंत्रालयाच्या अहवालाच्या विरोधात गेले आणि राजांच्या 2 जी धोरणाला 'तत्त्वतः' पाठिंबा दिलाअनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.

2 जी: अनुत्तरित प्रश्न

- 2 जी घोटाळ्याबाबत चिंदबरमना एकट्याला टार्गेट करण्याचा प्रणव मुखर्जी प्रयत्न करतायत का ?- प्रणव मुखजीर्ंकडे चिदंबरम यांच्याविरोधात पुरावे होते, तर कॅगला दिलेल्या उत्तरात त्यांनी क्लीन चिट का दिली ?- पंतप्रधान, प्रणव मुखजीर्ंनाही या व्यवहारांची कल्पना होती, तर ते राजांना थांबवू शकले नसते का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2011 05:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close