S M L

खडकवासला मनसेचा उमेदवार नसणार !

21 सप्टेंबरपुण्यात खडकवासलाच्या पोटनिवडणुकीत मनसे उमेदवार उभा करणार नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. हीचं आपली रमेश वांजळेंना श्रद्धांजली असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तसेच शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत माझी एक प्रतिक्रिया काय झोंबली अजून निवडणुका बाकी आहे ही तर नुसती एक टिचकी मारली आहे अजून आतषबाजी बाकी आहे अशा शब्दात राज यांनी वेट ऍन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.गेल्या तीन दिवसांपासून ठाकरेभावकीमध्ये टीका-टिप्पणीनं निवडणुकी अगोदरच मैदानात धुळवळ उडाली. राज ठाकरे यांनी महापालिकेच्या ऑनलाईन खड्डे बुजवा या मोहिमेवर टीका करत उध्दव ठाकरे यांना टार्गेट केलं. परराज्यात जाऊन प्राण्यांचे फोटो काढण्यापेक्षा मुंबईतील रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांचे फोटो काढा,असा टोला राज यांनी लगावला होता. यावर पलटवार करत उद्धव यांनी राज ठाकरेंवर हल्ला चढवला. नमकहराम जनावरापेक्षा जंगलातल्या इमानी जनावरांचे फोटो काढण्यात खरा आनंद आहे. काही जनावरांना फालतू बकबक आणि बकवास करण्याशिवाय दुसरा कोणताही धंदा राहिलेला नाही. काही लोकांना फुकटचे सल्ले देऊन प्रसिध्दी मिळवण्याचा रोग जडला आहे. त्यांच्या फालतू बकबकीकडे आपण लक्ष देत नाही, आणि महाराष्ट्राची जनताही लक्ष देणार नाही याची मला खात्री आहे अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर हल्ला चढवला होता. आज राज यांनी आपल्या कृष्णकुंज निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन पुण्यात खडकवासलाच्या पोटनिवडणुकीत मनसे उमेदवार उभा करणार नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. पुण्यात खडकवासलाच्या पोटनिवडणुकीत मनसे उमेदवार उभा करणार नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. मला अशा घाणरेड्या राजकारणात रस नाही. रमेश वांजळे मनसेत येण्याअगोदर राष्ट्रवादीत प्रवेश घेण्यासाठी गेले होते. पण 'गोल्डनमॅन' वांजळेंना पाहुन त्यांना प्रवेश दिला नाही. आणि आता राष्ट्रवादी त्यांच्यामागे लागली आहे. असंल राजकारण अजित पवारांकडे असो. या राजकारणापेक्षा आम्ही आमचा उमेदावार उभा करणार नाही असा निर्णय घेतला नाही असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. अधिक बातम्या नमकहराम जनावरापेक्षा फोटोग्राफी बरी - उध्दव ठाकरे- उध्दव ठाकरेंनी खड्‌ड्यांची फोटोग्राफी करावी - राज ठाकरे

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2011 01:22 PM IST

खडकवासला मनसेचा उमेदवार नसणार !

21 सप्टेंबर

पुण्यात खडकवासलाच्या पोटनिवडणुकीत मनसे उमेदवार उभा करणार नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. हीचं आपली रमेश वांजळेंना श्रद्धांजली असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तसेच शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत माझी एक प्रतिक्रिया काय झोंबली अजून निवडणुका बाकी आहे ही तर नुसती एक टिचकी मारली आहे अजून आतषबाजी बाकी आहे अशा शब्दात राज यांनी वेट ऍन्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून ठाकरेभावकीमध्ये टीका-टिप्पणीनं निवडणुकी अगोदरच मैदानात धुळवळ उडाली. राज ठाकरे यांनी महापालिकेच्या ऑनलाईन खड्डे बुजवा या मोहिमेवर टीका करत उध्दव ठाकरे यांना टार्गेट केलं. परराज्यात जाऊन प्राण्यांचे फोटो काढण्यापेक्षा मुंबईतील रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांचे फोटो काढा,असा टोला राज यांनी लगावला होता. यावर पलटवार करत उद्धव यांनी राज ठाकरेंवर हल्ला चढवला. नमकहराम जनावरापेक्षा जंगलातल्या इमानी जनावरांचे फोटो काढण्यात खरा आनंद आहे.

काही जनावरांना फालतू बकबक आणि बकवास करण्याशिवाय दुसरा कोणताही धंदा राहिलेला नाही. काही लोकांना फुकटचे सल्ले देऊन प्रसिध्दी मिळवण्याचा रोग जडला आहे. त्यांच्या फालतू बकबकीकडे आपण लक्ष देत नाही, आणि महाराष्ट्राची जनताही लक्ष देणार नाही याची मला खात्री आहे अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर हल्ला चढवला होता. आज राज यांनी आपल्या कृष्णकुंज निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन पुण्यात खडकवासलाच्या पोटनिवडणुकीत मनसे उमेदवार उभा करणार नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

पुण्यात खडकवासलाच्या पोटनिवडणुकीत मनसे उमेदवार उभा करणार नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. मला अशा घाणरेड्या राजकारणात रस नाही. रमेश वांजळे मनसेत येण्याअगोदर राष्ट्रवादीत प्रवेश घेण्यासाठी गेले होते. पण 'गोल्डनमॅन' वांजळेंना पाहुन त्यांना प्रवेश दिला नाही. आणि आता राष्ट्रवादी त्यांच्यामागे लागली आहे. असंल राजकारण अजित पवारांकडे असो. या राजकारणापेक्षा आम्ही आमचा उमेदावार उभा करणार नाही असा निर्णय घेतला नाही असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं.

अधिक बातम्या

नमकहराम जनावरापेक्षा फोटोग्राफी बरी - उध्दव ठाकरे- उध्दव ठाकरेंनी खड्‌ड्यांची फोटोग्राफी करावी - राज ठाकरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2011 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close