S M L

पुण्यात गुंडांची मुख्याध्यापकाला मारहाण

21 सप्टेंबरनाशिकमध्ये गुंडांच्या मारहाणीत एका प्राचार्याचा मृत्यू झाल्याची बातमी ताजी असतानाच पुणे परिसरातही एका मुख्याध्यापकाला मारहाण झाल्याची बातमी समोर आलीय. मुख्याध्यापक चंद्रकांत झेंडे यांना मारहाण करण्यात आली. मावळचे काँग्रेसचे खजिनदार विलास विकारी यांनी मारहाण केल्याची तक्रार लोणावळा पोलिसात दाखल करण्यात आली. जमीन व्यवहाराच्या मुद्द्यावरुन ही मारहाण झाल्याचं सांगितलं जातंय. जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करणार्‍या राजकीय पदाधिकार्‍याने भारत इंग्लीश स्कूलच्या मुख्याध्यापकांना बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. मुख्याध्यापक चंद्रकांत झेंडे विद्या प्रसारिणी सभेची लोणावळा परिसरातली जमीन पाहण्यासाठी गेले होते. यावेळी मावळ काँग्रेसचे खजिनदार विलास विकारी यांनी मारहाण केल्याचा झेंडे यांचा आरोप आहे. याप्रकरणी लोणावळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या प्रसारिणी सभेची लोणावळ्याजवळील वाकसई येथे 10.5 साडेदहा एकर जमीन आहे. संस्थेनं पूर्वी ही जमीन विलास विकारींना कसण्याकरता दिली होती. संस्थेनं जमीन परत मागितल्यानंतर प्रकरण हाय कोर्टात गेलं. संस्थेच्या बाजून निकाल लागल्यानंतर विकारींनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली. संस्थेच्या अध्यक्षांच्या सांगण्यावरून पुण्यातील संस्थेच्या भारत इंग्लीश स्कूलचे प्राचार्य चंद्रकांत झेंडे त्याच्या काही सहकारी शिक्षकांसह वृक्षारोपणाकरता जागेवर गेले असता विलास विकारी यानं त्याच्या साथीदारांसह शिवीगाळ करत झेंडेंना बेदम मारहाण केली. झेंडेना पुण्यातील औंध येथे रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.पोलिसांना संरक्षण मागूनही पोलीस विकारीलाच प्रोटेक्ट करत असल्याचा आरोप संस्थेनं केला.विलास विकारीनं आरोप फेटाळून लावत आपण घटना घडली त्यादिवशी लोणावळ्यात नाही तर पुण्यात होतो असा दावा केलाय तर जमिनीवर हक्क सांगत सुप्रीम कोर्टाने केस दाखल केल्याचे स्पष्टीकरण दिलं. पोलिसांनी कोर्टात प्रकरण असल्याने पोलीस संरक्षण दिलं नसल्याचे सांगत विकारीवर गुन्हा दाखल केला.संस्था आणि राजकीय पुढारी यांच्या वादात एका शिक्षकाला झालेली मारहाण संताप व्यक्त करणारी आहे. न्यायालयात प्रकरण सुरू असल्यानं दोनी बाजूनी संयम पाळण्याची गरज आहे तसंच पोलिसांनीही निष्पक्षपातीपणे तपास करायची आवश्यकता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 21, 2011 05:46 PM IST

पुण्यात गुंडांची मुख्याध्यापकाला मारहाण

21 सप्टेंबर

नाशिकमध्ये गुंडांच्या मारहाणीत एका प्राचार्याचा मृत्यू झाल्याची बातमी ताजी असतानाच पुणे परिसरातही एका मुख्याध्यापकाला मारहाण झाल्याची बातमी समोर आलीय. मुख्याध्यापक चंद्रकांत झेंडे यांना मारहाण करण्यात आली. मावळचे काँग्रेसचे खजिनदार विलास विकारी यांनी मारहाण केल्याची तक्रार लोणावळा पोलिसात दाखल करण्यात आली. जमीन व्यवहाराच्या मुद्द्यावरुन ही मारहाण झाल्याचं सांगितलं जातंय.

जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करणार्‍या राजकीय पदाधिकार्‍याने भारत इंग्लीश स्कूलच्या मुख्याध्यापकांना बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. मुख्याध्यापक चंद्रकांत झेंडे विद्या प्रसारिणी सभेची लोणावळा परिसरातली जमीन पाहण्यासाठी गेले होते. यावेळी मावळ काँग्रेसचे खजिनदार विलास विकारी यांनी मारहाण केल्याचा झेंडे यांचा आरोप आहे.

याप्रकरणी लोणावळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या प्रसारिणी सभेची लोणावळ्याजवळील वाकसई येथे 10.5 साडेदहा एकर जमीन आहे. संस्थेनं पूर्वी ही जमीन विलास विकारींना कसण्याकरता दिली होती. संस्थेनं जमीन परत मागितल्यानंतर प्रकरण हाय कोर्टात गेलं. संस्थेच्या बाजून निकाल लागल्यानंतर विकारींनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

संस्थेच्या अध्यक्षांच्या सांगण्यावरून पुण्यातील संस्थेच्या भारत इंग्लीश स्कूलचे प्राचार्य चंद्रकांत झेंडे त्याच्या काही सहकारी शिक्षकांसह वृक्षारोपणाकरता जागेवर गेले असता विलास विकारी यानं त्याच्या साथीदारांसह शिवीगाळ करत झेंडेंना बेदम मारहाण केली. झेंडेना पुण्यातील औंध येथे रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.पोलिसांना संरक्षण मागूनही पोलीस विकारीलाच प्रोटेक्ट करत असल्याचा आरोप संस्थेनं केला.

विलास विकारीनं आरोप फेटाळून लावत आपण घटना घडली त्यादिवशी लोणावळ्यात नाही तर पुण्यात होतो असा दावा केलाय तर जमिनीवर हक्क सांगत सुप्रीम कोर्टाने केस दाखल केल्याचे स्पष्टीकरण दिलं. पोलिसांनी कोर्टात प्रकरण असल्याने पोलीस संरक्षण दिलं नसल्याचे सांगत विकारीवर गुन्हा दाखल केला.संस्था आणि राजकीय पुढारी यांच्या वादात एका शिक्षकाला झालेली मारहाण संताप व्यक्त करणारी आहे. न्यायालयात प्रकरण सुरू असल्यानं दोनी बाजूनी संयम पाळण्याची गरज आहे तसंच पोलिसांनीही निष्पक्षपातीपणे तपास करायची आवश्यकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2011 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close