S M L

प्रमोद महाजनांनंतर पूनम की राहुल ?

16 नोव्हेंबर मुंबईविनोद तळेकर प्रमोद महाजनांनंतर पूनम की राहुल? हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. बिग बॉसमुळे राहुलला प्रसिद्धी मिळत आहे तर पूनमच्या नावानंही मुंबईत जोरदार पोस्टरबाजी सुरू आहे.लोकसभा निवडणुकांची तयारी सर्वच पक्षात सुरू झाली आहे. उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांनी आपआपल्या पक्षात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. दक्षिण मुंबईतून भाजपाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या पूनम महाजनसुद्धा चर्चेत आहेत, ते त्यांच्या होर्डिंग कॅम्पेनमुळे.लोकसभेच्या उमेदवारीबद्दल पूनम महाजन म्हणतात तो निर्णय पार्टी घेईल. पण सध्या मी महाराष्ट्राच्या युवा मोर्चाची मंत्री असल्यामुळे जास्तीत जास्त युवकांना भाजपाकडे कसे आणावे हे माझं पहिलं काम आहे. पक्ष जी जबाबदारी देईल त्याचं मी पालन करेन असंही त्यांनी यावेळी सांगितलं.प्रमोद महाजन यांच्यानंतर पूनम सक्रिय राजकारणात उतरणार याचे हे स्पष्ट संकेत मानले जातात. दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी त्या प्रयत्नशील आहे. मतदार संघ फेररचनेत दोन मतदार संघाचा मिळून दक्षिण मुंबई हा एक मतदारसंघ झालाय शिवसेनेचे मोहन रावले यापैकी एका मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत .तर दुस-या मतदार संघातून भाजपच्या जयवंतीबेन मेहता पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे दोन्ही मतदारसंघाचा एक मतदारसंघ झाल्यानं ही जागा कोणी लढवायची, या मुद्यावर सेना भाजपमध्ये चुरस आहे. तर भाजपला ही जागा मिळाल्यास, भाजपमध्येही उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच होणार हे मात्र निश्चित

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2008 04:37 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2008 04:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close