S M L

टू जी प्रकरणी चिदंबरम यांची काँग्रेसने केली पाठराखण

22 सप्टेंबरप्रणव मुखजीर्ंनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पी.चिदंबरम यांच्याबाबत लिहीलेल्या पत्रानंतर आता त्यावर प्रतिक्रिया उमटत आहे. काँग्रेसनं चिदंबरम यांची पाठराखण केली. चिदंबरम यांच्यावर संशय घेण्याचं काही कारणच नाही असं काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी म्हटलं आहे. हे मीडियाने लावलेले अर्थ आहेत. त्यामुळेच आम्ही चिदंबरम यांच्या पाठीशी आहोत असंही खुर्शीद यांनी स्पष्ट केलं. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात तेव्हाचे अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी भूमिका निभावली होती अशी माहिती देणारे महत्त्वाचे सरकारी पत्र पुढे आलंय. विशेष म्हणजे हे पत्र सध्याचे अर्थमंत्री प्रणव मुखजीर्ंनी लिहिलंय. प्रणव मुखजीर्ंनी पंतप्रधानांना हे पत्र 25 मार्च 2011 ला लिहिलं होतं. त्यात मुखर्जी लिहितात की चिदंबरम यांची इच्छा असती, तर ते 2 जी चे चुकीच्या पद्धतीनं दिले जाणारे परवाने रोखू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. हे पत्र सुब्रमण्यम स्वामी यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळवले. स्वामी हे स्पेक्ट्रम केसचे याचिकाकर्ते आहेत. त्यांनी हे पत्र चिदंबरम यांच्याविरोधात पुरावा म्हणून कोर्टात सादर केलंय. दरम्यान या प्रकरणावरून चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी या दोघांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी फोनवरून बातचीत केली. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनीही पंतप्रधानांशी चर्चा केली. 2 जी घोटाळ्यात चिदंबरम यांचा सहभाग असल्याचा आरोप काँग्रेसने फेटाळून लावला. मुखर्जी आणि चिदंबरम यांच्यात कोणतेच मतभेद नाहीत असं काँग्रेस आणि सरकारच्या सूत्रांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2011 10:05 AM IST

टू जी प्रकरणी चिदंबरम यांची काँग्रेसने केली पाठराखण

22 सप्टेंबर

प्रणव मुखजीर्ंनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पी.चिदंबरम यांच्याबाबत लिहीलेल्या पत्रानंतर आता त्यावर प्रतिक्रिया उमटत आहे. काँग्रेसनं चिदंबरम यांची पाठराखण केली. चिदंबरम यांच्यावर संशय घेण्याचं काही कारणच नाही असं काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी म्हटलं आहे. हे मीडियाने लावलेले अर्थ आहेत.

त्यामुळेच आम्ही चिदंबरम यांच्या पाठीशी आहोत असंही खुर्शीद यांनी स्पष्ट केलं. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात तेव्हाचे अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी भूमिका निभावली होती अशी माहिती देणारे महत्त्वाचे सरकारी पत्र पुढे आलंय. विशेष म्हणजे हे पत्र सध्याचे अर्थमंत्री प्रणव मुखजीर्ंनी लिहिलंय. प्रणव मुखजीर्ंनी पंतप्रधानांना हे पत्र 25 मार्च 2011 ला लिहिलं होतं.

त्यात मुखर्जी लिहितात की चिदंबरम यांची इच्छा असती, तर ते 2 जी चे चुकीच्या पद्धतीनं दिले जाणारे परवाने रोखू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. हे पत्र सुब्रमण्यम स्वामी यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळवले. स्वामी हे स्पेक्ट्रम केसचे याचिकाकर्ते आहेत. त्यांनी हे पत्र चिदंबरम यांच्याविरोधात पुरावा म्हणून कोर्टात सादर केलंय. दरम्यान या प्रकरणावरून चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी या दोघांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी फोनवरून बातचीत केली. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनीही पंतप्रधानांशी चर्चा केली. 2 जी घोटाळ्यात चिदंबरम यांचा सहभाग असल्याचा आरोप काँग्रेसने फेटाळून लावला. मुखर्जी आणि चिदंबरम यांच्यात कोणतेच मतभेद नाहीत असं काँग्रेस आणि सरकारच्या सूत्रांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2011 10:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close