S M L

औरंगाबाद महापालिकेतून 3 हजार फाईल्स गायब

22 सप्टेंबरआधीच घोटाळ्यांमुळे वादग्रस्त ठरलेल्या औरंगाबाद महापालिकेच्या नगररचना विभागच्या रेकॉर्डरूममधून तब्बल तीन हजार फाईल गहाळ झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत नव्या वादाला तोंड फुटले आहेत. याप्रकरणी अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे. औरंगाबाद महापालिकेच्या नगररचना विभागाच्या रेकॉर्ड रूममधून तब्बल तीन हजार फाईल गहाळ झाल्या आहेत. या फाईली कुणी नेल्यात याचा अहवाल महापालिका आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी मागितला आहे. अनेक दिवसांपासून शोध घेऊनही या फाईल सापडत नाहीत. रेकॉर्ड रूमच्या रजिस्टरमधील नोदीवरून सध्या तपास करण्यात येत आहे. नगररचना विभागातील या फाईली सापडल्या नाहीत, तर अनेक मालमत्तांच्या बाबतीतीतली माहितीच दडपली जाणार आहे. त्यामुळे याप्रकरणी आता लोकप्रतिनिधींनीही सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2011 05:53 PM IST

औरंगाबाद महापालिकेतून 3 हजार फाईल्स गायब

22 सप्टेंबर

आधीच घोटाळ्यांमुळे वादग्रस्त ठरलेल्या औरंगाबाद महापालिकेच्या नगररचना विभागच्या रेकॉर्डरूममधून तब्बल तीन हजार फाईल गहाळ झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत नव्या वादाला तोंड फुटले आहेत. याप्रकरणी अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे. औरंगाबाद महापालिकेच्या नगररचना विभागाच्या रेकॉर्ड रूममधून तब्बल तीन हजार फाईल गहाळ झाल्या आहेत. या फाईली कुणी नेल्यात याचा अहवाल महापालिका आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी मागितला आहे. अनेक दिवसांपासून शोध घेऊनही या फाईल सापडत नाहीत. रेकॉर्ड रूमच्या रजिस्टरमधील नोदीवरून सध्या तपास करण्यात येत आहे. नगररचना विभागातील या फाईली सापडल्या नाहीत, तर अनेक मालमत्तांच्या बाबतीतीतली माहितीच दडपली जाणार आहे. त्यामुळे याप्रकरणी आता लोकप्रतिनिधींनीही सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2011 05:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close