S M L

सेन्सेक्समध्ये 704 अंकांनी घसरण

22 सप्टेंबरजागतिक शेअर बाजारातील अस्थिरता आणि रुपयाचं झालेलं अवमूल्यन याचा परिणाम भारतीय शेअरबाजारावर झालेला आहे. दिवसाच्या ट्रेडिंग अखेरीस शेअरबाजारात 700 पेक्षा जास्त पाँईंटसची घसरण झाली तर निफ्टीतही 209 पॉइंटची घसरण झाली. गेल्या 12 महिन्यांतली शेअरबाजारातली सगळ्यात मोठी घसरण आहे. सेन्सेक्स स्टॉक्समधल्या तब्बल 9 कंपन्यांच्या शेअर्सची 4 ते 7% पर्यंत घसरण झालेली आहे. टीसीएस, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, एसबीआय, इनफोसेस, आयटीसी, एल अँन्ड टी, विप्रो, आयसीसीआस बँक, टाटा मोटर्स अशा सगळ्याच कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झालेली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य पण घसरलेलं आहे. रुपयाची किंमत एका डॉलरसाठी 49.19 रुपये इतकी झालेली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2011 10:52 AM IST

सेन्सेक्समध्ये 704 अंकांनी घसरण

22 सप्टेंबर

जागतिक शेअर बाजारातील अस्थिरता आणि रुपयाचं झालेलं अवमूल्यन याचा परिणाम भारतीय शेअरबाजारावर झालेला आहे. दिवसाच्या ट्रेडिंग अखेरीस शेअरबाजारात 700 पेक्षा जास्त पाँईंटसची घसरण झाली तर निफ्टीतही 209 पॉइंटची घसरण झाली. गेल्या 12 महिन्यांतली शेअरबाजारातली सगळ्यात मोठी घसरण आहे. सेन्सेक्स स्टॉक्समधल्या तब्बल 9 कंपन्यांच्या शेअर्सची 4 ते 7% पर्यंत घसरण झालेली आहे. टीसीएस, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, एसबीआय, इनफोसेस, आयटीसी, एल अँन्ड टी, विप्रो, आयसीसीआस बँक, टाटा मोटर्स अशा सगळ्याच कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झालेली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य पण घसरलेलं आहे. रुपयाची किंमत एका डॉलरसाठी 49.19 रुपये इतकी झालेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2011 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close