S M L

सचिनच्या प्रस्तावाला द्रविडचा पाठिंबा

22 सप्टेंबरमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सुचवलेला वन डे क्रिकेटचा फार्म्युला आयसीसीनं फेटाळला असला तरी भारतीय टीममधल्या त्याच्या सहकार्‍यांनी मात्र त्याला पाठिंबा दिला आहे. 50 ओव्हर्सच्या मॅचऐवजी 25 ओव्हर्सच्या 4 इनिंग खेळवण्याचा प्रस्ताव सचिनने आयसीसीसमोर ठेवला होता. पण आता या फार्म्युलावर विचार केला जाऊ शकतो असं मत द वाल राहुल द्रविडने व्यक्त केलं आहे. टी-20 क्रिकेट लोकप्रिय होत असताना वन डे क्रिकेटसमोर नवी आव्हानं उभी राहत आहे. यावर सचिनने नवीन फॉर्म्युला सूचवला होता. वन डे मॅचमध्ये 25-25 ओव्हरची लढत घेण्यात यावी. असा पर्याय सचिनने आयसीसीचे अध्यक्ष हरुन लोगार्ट यांना एक पत्र लिहून सूचवला आहे. आता 'द वॉल' सचिनच्या पाठीशी उभी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2011 02:18 PM IST

सचिनच्या प्रस्तावाला द्रविडचा पाठिंबा

22 सप्टेंबर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सुचवलेला वन डे क्रिकेटचा फार्म्युला आयसीसीनं फेटाळला असला तरी भारतीय टीममधल्या त्याच्या सहकार्‍यांनी मात्र त्याला पाठिंबा दिला आहे. 50 ओव्हर्सच्या मॅचऐवजी 25 ओव्हर्सच्या 4 इनिंग खेळवण्याचा प्रस्ताव सचिनने आयसीसीसमोर ठेवला होता. पण आता या फार्म्युलावर विचार केला जाऊ शकतो असं मत द वाल राहुल द्रविडने व्यक्त केलं आहे.

टी-20 क्रिकेट लोकप्रिय होत असताना वन डे क्रिकेटसमोर नवी आव्हानं उभी राहत आहे. यावर सचिनने नवीन फॉर्म्युला सूचवला होता. वन डे मॅचमध्ये 25-25 ओव्हरची लढत घेण्यात यावी. असा पर्याय सचिनने आयसीसीचे अध्यक्ष हरुन लोगार्ट यांना एक पत्र लिहून सूचवला आहे. आता 'द वॉल' सचिनच्या पाठीशी उभी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2011 02:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close