S M L

दिवसाला 186 रूपये खर्च..सरकार म्हणतं तुम्ही श्रीमंत !

गोविंद तुपे, मुंबई22 सप्टेंबरनियोजन आयोगाने सुप्रीम कोर्टात एक अफिडेविट सादर केलं. यामध्ये सरकारने सर्वसामान्यांची थट्टाच केली. कारण महापालिका क्षेत्रात राहणारी कोणतीही व्यक्ती दिवसाला 32 रूपये खर्च करत असेल तर ती दारिद्ररेषेखाली येत नाही,असा दावा नियोजन आयोगानं केला. त्यामुळे सामान्यांमध्ये संताप व्यक्त होतोय.मुंबईतल्या मानखुर्द भागात राहणार्‍या छबुबाई शिरसाठ ह्याही त्यांच्यापैकीच एक, दिवसाची कमाई जेमतेम 150 ते 200 च्या घरात पाच माणसांच्या या कुंटुंबात नवरा पेंटीगच काम करतो आणि त्या प्लॅस्टिकवर लसून विकुन कुटुंबाचे गुजराण करतात.______________________शिरसाठ कुंटुबांचा जेवणावरच्या खर्च_________________________- 20 रूपये नाश्ता, चहा - 16 रूपये अर्धा लिटर दूध- 15 रूपये भुसा आणि लाकडं- 25 रूपये 1 किलो तांदूळ (हलक्या प्रतीचा)- 25 रूपये एक किलो गव्हाचं पिठ- 30 रूपये दोन वेळच्या भाज्या- 40 रूपये कांदा, मिठ, मिरची, मसाला - 15 रूपये गोडेतेल_________________________नुसतं यांच जेवणावर एका दिवसाला 186 रूपये खर्च होतात. ते ही साध्या आणि हलक्या पद्धतीच्या. 25 रूपये लिटरचं रॉकेल परवडत नाही म्हणून या भुस्याच्या सिगडीवर स्वयंपाक करणार्‍या या काकीचं कुटुंबाचं एका दिवसाचं जेवनाचं नुसत बजेट आहे 186 रूपये. यांच्या सारखीच हातावरचे पोट असणारी महाराष्टातील लोकसंख्या जवळपास 3 कोटींच्या घरात आहे. पण सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या अफिडेविटनुसार, शिरसाठं कुटूंब मात्र दारिद्य रेषेखाली येत नाही. कारण सरकारच्या म्हणण्यानुसार शहरी भागात दिवसाला 32 रुपये आणि ग्रामिण भागात दिवसाला 26 रूपये रूपये खर्च करणारा कोणतीही व्यक्ती दारिद्र्यरेषेखाली येत नाही. शिरसाठ कुटुंबाचा खर्च 26 रुपये जास्त असल्याने त्यांना दारिद्र रेषेखालील कुटुंबासाठी असलेल्या सरकारी योजनांचा आता लाभ मिळणार नाही. महागाईने गरिबांचं जगणं मुश्कील झालं असतांना सरकारच्या या नव्या ऍफिडेव्हिटनं गरिबांची थट्टाचं मांडली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2011 02:35 PM IST

दिवसाला 186 रूपये खर्च..सरकार म्हणतं तुम्ही श्रीमंत !

गोविंद तुपे, मुंबई

22 सप्टेंबर

नियोजन आयोगाने सुप्रीम कोर्टात एक अफिडेविट सादर केलं. यामध्ये सरकारने सर्वसामान्यांची थट्टाच केली. कारण महापालिका क्षेत्रात राहणारी कोणतीही व्यक्ती दिवसाला 32 रूपये खर्च करत असेल तर ती दारिद्ररेषेखाली येत नाही,असा दावा नियोजन आयोगानं केला. त्यामुळे सामान्यांमध्ये संताप व्यक्त होतोय.

मुंबईतल्या मानखुर्द भागात राहणार्‍या छबुबाई शिरसाठ ह्याही त्यांच्यापैकीच एक, दिवसाची कमाई जेमतेम 150 ते 200 च्या घरात पाच माणसांच्या या कुंटुंबात नवरा पेंटीगच काम करतो आणि त्या प्लॅस्टिकवर लसून विकुन कुटुंबाचे गुजराण करतात.______________________

शिरसाठ कुंटुबांचा जेवणावरच्या खर्च_________________________

- 20 रूपये नाश्ता, चहा - 16 रूपये अर्धा लिटर दूध- 15 रूपये भुसा आणि लाकडं- 25 रूपये 1 किलो तांदूळ (हलक्या प्रतीचा)- 25 रूपये एक किलो गव्हाचं पिठ- 30 रूपये दोन वेळच्या भाज्या- 40 रूपये कांदा, मिठ, मिरची, मसाला - 15 रूपये गोडेतेल

_________________________

नुसतं यांच जेवणावर एका दिवसाला 186 रूपये खर्च होतात. ते ही साध्या आणि हलक्या पद्धतीच्या. 25 रूपये लिटरचं रॉकेल परवडत नाही म्हणून या भुस्याच्या सिगडीवर स्वयंपाक करणार्‍या या काकीचं कुटुंबाचं एका दिवसाचं जेवनाचं नुसत बजेट आहे 186 रूपये. यांच्या सारखीच हातावरचे पोट असणारी महाराष्टातील लोकसंख्या जवळपास 3 कोटींच्या घरात आहे.

पण सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या अफिडेविटनुसार, शिरसाठं कुटूंब मात्र दारिद्य रेषेखाली येत नाही. कारण सरकारच्या म्हणण्यानुसार शहरी भागात दिवसाला 32 रुपये आणि ग्रामिण भागात दिवसाला 26 रूपये रूपये खर्च करणारा कोणतीही व्यक्ती दारिद्र्यरेषेखाली येत नाही. शिरसाठ कुटुंबाचा खर्च 26 रुपये जास्त असल्याने त्यांना दारिद्र रेषेखालील कुटुंबासाठी असलेल्या सरकारी योजनांचा आता लाभ मिळणार नाही. महागाईने गरिबांचं जगणं मुश्कील झालं असतांना सरकारच्या या नव्या ऍफिडेव्हिटनं गरिबांची थट्टाचं मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2011 02:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close