S M L

लोकमतच्या 'फुटबॉल स्पर्धेवर' पुस्तकाचे थाटात प्रकाशन

22 सप्टेंबरनागपूरमध्ये दैनिक लोकमतने आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धेवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन आज दिल्लीत करण्यात आलं. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल पटेल यांनी या हिंदी-इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन केलं. नागपूर प्रीमियर लीग या नावाने घेतलेल्या या स्पर्धेला फुटबॉलप्रेमींनी जोरदार प्रतिसाद दिला होता. नागपूरनंतर आता औरंगाबाद आणि कोल्हापुरातही फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात येतंय. या स्पर्धांना आम्ही पूर्ण सहकार्य करू असं आश्वासन प्रफुल पटेल यांनी दिलं. तर यापुढे फुटबॉल आणि क्रिकेट हे दोन्ही खेळ सोबत वाटचाल करतील अशी अपेक्षा आयपीएलचे नवे अध्यक्ष राजीव शुक्ल यांनी व्यक्त केली. या प्रसंगी लोकमत मीडियाचे चेयरमन खासदार विजय दर्डा आणि नागपूर प्रीमियर लीगमधल्या सर्व टीम्सचे मालक उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2011 04:36 PM IST

लोकमतच्या 'फुटबॉल स्पर्धेवर' पुस्तकाचे थाटात प्रकाशन

22 सप्टेंबर

नागपूरमध्ये दैनिक लोकमतने आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धेवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन आज दिल्लीत करण्यात आलं. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल पटेल यांनी या हिंदी-इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन केलं. नागपूर प्रीमियर लीग या नावाने घेतलेल्या या स्पर्धेला फुटबॉलप्रेमींनी जोरदार प्रतिसाद दिला होता. नागपूरनंतर आता औरंगाबाद आणि कोल्हापुरातही फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात येतंय. या स्पर्धांना आम्ही पूर्ण सहकार्य करू असं आश्वासन प्रफुल पटेल यांनी दिलं. तर यापुढे फुटबॉल आणि क्रिकेट हे दोन्ही खेळ सोबत वाटचाल करतील अशी अपेक्षा आयपीएलचे नवे अध्यक्ष राजीव शुक्ल यांनी व्यक्त केली. या प्रसंगी लोकमत मीडियाचे चेयरमन खासदार विजय दर्डा आणि नागपूर प्रीमियर लीगमधल्या सर्व टीम्सचे मालक उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2011 04:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close