S M L

'मौसम' होणार उद्या रिलीज

22 सप्टेंबरया वीकेण्डला शाहिद कपूर आणि सोनम कपूरचा मौसम हा सिनेमा रिलीज होत आहे. तर मराठीमध्ये यावेळी एकही सिनेमा रिलीज होत नाही. मौसमच्या जोडीला स्पीडी सिंग आणि हॉलिवूडचा जॉनी इंग्लिश रिबॉर्न हे दोन सिनेमे रिलीज होत आहे. या आठवड्यात शाहिद कपूर आणि सोनम कपूरचा मौसम हा सिनेमा प्रेक्षकांसमोर येतोय. सिनेमाच्या प्रोमोजमधून शाहिद आणि सोनमची केमिस्ट्री छान जुळलीय असं सध्यातरी दिसतंय. हा सिनेमा एक प्रेमकहाणी आहे. जी चार वेगवेळ्या ऋतुंमध्ये बहरत जाते. आणि यासाठी पंजाबमधील विविध लोकेशन्स यात निवडण्यात आली. आपल्या उत्तम अदाकारीने आजपर्यंत निरनिराळ्या भूमिका रंगवणारे अभिनेते पंकज कपूर या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहेत. या सिनेमातील गाणी याआधीच लोकप्रिय झाली. तेव्हा पंकज कपूर यांचा दिग्दर्शन म्हणून पहिलाच प्रयत्न किती यशस्वी ठरतो .ते कळेलच. मौसमच्या जोडीला या आठवड्यात स्पीडी सिंग हा हिंग्लीश सिनेमा रिलीज होतोय. आपल्या मुलाने हॉकी खेळणे सोडून आपल्या घरचा बिझनेस सांभाळावा अशी पित्याची इच्छा असते. तेव्हा आपल्या पित्याची इच्छा आणि हॉकी यामध्ये गुरफटलेल्या मुलाची ही कथा आहे. या पित्याचे कॅरेक्टर उभं केलंय अभिनेते अनुपम खेर यांनी , याबरोबर विनय वीरमानी ,रसेल पिटर्स यांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत. तर रॉबर्ट लिबरमन यांचं दिग्दर्शन आहे. हॉलिवूडचा जॉनी इंग्लिश रिबॉर्न हा मिस्टर बीन सिरीजमधील नवीन विनोदी सिनेमा रिलीज होतोय. मिस्टर बीन ची अफलातून भूमिका साकारणारा रोवान ऍटकिन्सन यातही अनेक धमाल करामती साकारतोय. यात मिस्टर बीन एक इंटलिजन्स अधिकारी रंगवतोय ह्या अधिकार्‍याकडे जगातील अनेक टॉप सिक्रेटस आहेत. आणि ती तो जगासमोर मांडून अनेक कृत्यांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करतोय. यात घडणार्‍या करामती म्हणजे हा सिनेमा.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2011 04:44 PM IST

'मौसम' होणार उद्या रिलीज

22 सप्टेंबर

या वीकेण्डला शाहिद कपूर आणि सोनम कपूरचा मौसम हा सिनेमा रिलीज होत आहे. तर मराठीमध्ये यावेळी एकही सिनेमा रिलीज होत नाही. मौसमच्या जोडीला स्पीडी सिंग आणि हॉलिवूडचा जॉनी इंग्लिश रिबॉर्न हे दोन सिनेमे रिलीज होत आहे.

या आठवड्यात शाहिद कपूर आणि सोनम कपूरचा मौसम हा सिनेमा प्रेक्षकांसमोर येतोय. सिनेमाच्या प्रोमोजमधून शाहिद आणि सोनमची केमिस्ट्री छान जुळलीय असं सध्यातरी दिसतंय. हा सिनेमा एक प्रेमकहाणी आहे. जी चार वेगवेळ्या ऋतुंमध्ये बहरत जाते. आणि यासाठी पंजाबमधील विविध लोकेशन्स यात निवडण्यात आली. आपल्या उत्तम अदाकारीने आजपर्यंत निरनिराळ्या भूमिका रंगवणारे अभिनेते पंकज कपूर या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहेत. या सिनेमातील गाणी याआधीच लोकप्रिय झाली. तेव्हा पंकज कपूर यांचा दिग्दर्शन म्हणून पहिलाच प्रयत्न किती यशस्वी ठरतो .ते कळेलच. मौसमच्या जोडीला या आठवड्यात स्पीडी सिंग हा हिंग्लीश सिनेमा रिलीज होतोय. आपल्या मुलाने हॉकी खेळणे सोडून आपल्या घरचा बिझनेस सांभाळावा अशी पित्याची इच्छा असते. तेव्हा आपल्या पित्याची इच्छा आणि हॉकी यामध्ये गुरफटलेल्या मुलाची ही कथा आहे. या पित्याचे कॅरेक्टर उभं केलंय अभिनेते अनुपम खेर यांनी , याबरोबर विनय वीरमानी ,रसेल पिटर्स यांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत. तर रॉबर्ट लिबरमन यांचं दिग्दर्शन आहे.

हॉलिवूडचा जॉनी इंग्लिश रिबॉर्न हा मिस्टर बीन सिरीजमधील नवीन विनोदी सिनेमा रिलीज होतोय. मिस्टर बीन ची अफलातून भूमिका साकारणारा रोवान ऍटकिन्सन यातही अनेक धमाल करामती साकारतोय. यात मिस्टर बीन एक इंटलिजन्स अधिकारी रंगवतोय ह्या अधिकार्‍याकडे जगातील अनेक टॉप सिक्रेटस आहेत. आणि ती तो जगासमोर मांडून अनेक कृत्यांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करतोय. यात घडणार्‍या करामती म्हणजे हा सिनेमा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2011 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close