S M L

अडवाणी सुरू करणार बिहारमधून रथयात्रा

23 सप्टेंबरलालकृष्ण अडवाणी आपली बहुचर्चित रथयात्रा गुजरातमधून नाही तर बिहारमधून सुरू करणार आहेत अशी माहिती आयबीएन-नेटवर्कला मिळाली. उपोषणानंतर मोदींना मिळालेल्या प्रसिद्धीला आणखी वाव मिळू नये यासाठी अडवाणींनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. यावेळी अडवाणी गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराला भेट देण्याची आपली दोन दशकांची परंपराही मोडणार आहेत. बिहारमधून रथयात्रा सुरू करण्यामागे एनडीए (NDA) च्या मित्रपक्षांना खूश करण्याचाही अडवाणींचा हेतू आहे. 11 ऑक्टोबरपासून ही यात्रा सुरू होणार आहे. त्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार झेंडा दाखवतील अशी शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2011 09:18 AM IST

अडवाणी सुरू करणार बिहारमधून रथयात्रा

23 सप्टेंबर

लालकृष्ण अडवाणी आपली बहुचर्चित रथयात्रा गुजरातमधून नाही तर बिहारमधून सुरू करणार आहेत अशी माहिती आयबीएन-नेटवर्कला मिळाली. उपोषणानंतर मोदींना मिळालेल्या प्रसिद्धीला आणखी वाव मिळू नये यासाठी अडवाणींनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. यावेळी अडवाणी गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराला भेट देण्याची आपली दोन दशकांची परंपराही मोडणार आहेत. बिहारमधून रथयात्रा सुरू करण्यामागे एनडीए (NDA) च्या मित्रपक्षांना खूश करण्याचाही अडवाणींचा हेतू आहे. 11 ऑक्टोबरपासून ही यात्रा सुरू होणार आहे. त्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार झेंडा दाखवतील अशी शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2011 09:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close